Dira killed his brother-in-law for family reasons | मोरे मळा : कौटुंबिक कारणावरून दिराने केला भावजयीचा खून

मोरे मळा : कौटुंबिक कारणावरून दिराने केला भावजयीचा खून

ठळक मुद्देधारदार शस्त्राने वार अनिल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार

पंचवटी : मोरे मळा परिसरातील रामनगर येथे कौटुंबिक कारणावरून दिराने भावजयीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि.2) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. सदर घटनेत ज्योति सुनिल पाटील (30) हिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मोरे मळा येथिल रामनगर येथे सुनिल पांडुरंग पाटील हा पत्नी ज्योती पाटील व भाऊ अनिल पांडुरंग पाटील यांच्या समवेत राहतो. पाटील कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमाराला संशयित आरोपी अनिल पाटील
व भावजयी ज्योति पाटील यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद निर्माण झाले त्यातून संशयित पाटील याने भावजयीला शिवीगाळ केली. त्यानंतर संशयिताने काहीतरी धारदार शस्त्राने ज्योतीच्या गळ्यावर वार केला त्यात ज्योती गंभीर जखमी झाल्याने तिला पती सुनिल याने तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला.
संशयित अनिल याने भावजयीवर वार केल्यानंतर तो लगेच घटनास्थळाहून पसार झाला पंचवटी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान या बाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संशयित अनिल हा काही काम धंदा करत नव्हता त्यातून वाद निर्माण झाला व सदर घटना घडली असे पोलिसांनी सांगितले तर संशयित अनिल हा पंचवटी पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याला काही वर्षांपूर्वी पंचवटी पोलिसांनी बॅटरी चोरी प्रकरणात ताब्यात घेतले होते.

Web Title: Dira killed his brother-in-law for family reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.