ट्रकचालकास मारण्याची धमकी देत डिझेलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:06 AM2018-09-25T00:06:30+5:302018-09-25T00:06:46+5:30

दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी ट्रकचालकास अडवून धमकी देऊन ट्रक पळवून नेला व त्यातील सुमारे ९० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना अंबड वसाहतीतील मुंगी इंडस्ट्रीज परिसरात घडली़

Diesel theft threatens to kill the truck owner | ट्रकचालकास मारण्याची धमकी देत डिझेलची चोरी

ट्रकचालकास मारण्याची धमकी देत डिझेलची चोरी

Next

नाशिक : दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी ट्रकचालकास अडवून धमकी देऊन ट्रक पळवून नेला व त्यातील सुमारे ९० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना अंबड वसाहतीतील मुंगी इंडस्ट्रीज परिसरात घडली़  हरियाणा राज्यातील पलवल तालुक्यातील रसूलपूर येथील भीमसिंग चंदनसिंग (४६) हा ट्रक (एचआर ५५, डी २८११) घेऊन जात होता़ यावेळी दुचाकीवरून (एमएच १५, एटी ८४११) आलेल्या तिघा संशयितांनी हा ट्रक अडविला़ यानंतर ट्रकचालक भीमसिंग यास जिवे मारण्याची धमकी देत ट्रकचा ताबा घेतला़ तर उर्वरित दोघांनी भीमसिंग यास दुचाकीवर बसवून ट्रकमधील सुमारे ९० लिटर डिझेल काढून घेतले़

Web Title: Diesel theft threatens to kill the truck owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.