शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

अखंडीत विज पुरवठ्यासाठी महावितरणचे कर्मचारी तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 2:34 PM

नाशिक: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले असताना या काळातही महावितरणची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. मात्र, विजेबाबतच्या तक्रारी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन न करता हेल्पलाईनवरच कराव्या असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर यांनी केले आहे.

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेची व्यवस्थायंदा बिल मिळणार नाही

नाशिक: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले असताना या काळातही महावितरणची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. मात्र, विजेबाबतच्या तक्रारी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन न करता हेल्पलाईनवरच कराव्या असे आवाहन महावितरणच्यानाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर यांनी केले आहे.

जमावबंदीच्या कालावधीतही सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यालयांत पाच टक्के उपस्थितीची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी प्रामुख्याने अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी (जनमित्र, यंत्रचालक) सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज आहेत.प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी मास्क, लिक्विड हॅण्डवॉश, सॅनेटायझर याचा सातत्याने वापर करण्याचे सुचित करण्यात आले आहे. यासोबतच दुरु स्तीच्या कामासाठी जाताना अभियंता व जनिमत्रांनी स्वत:चे ओळखपत्र सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो तत्परतेने पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

महावितरणकडून सोमवार (दि.२३) पासून वीजिबलांची छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत छपाई सुरु होईपर्यंत वीजग्राहकांना वीजिबल मिळणार नाहीत. तसेच वीजमीटरचे रिडींग सुद्धा घेण्यात येणार नाही. मात्र महावितरणच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल अ‍ॅपवर वीजिबल उपलब्ध आहेत. यासोबतच महावितरणकडे मोबाईल क्र मांक रजिस्टर्ड केलेल्या वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजिबलाची माहिती पाठविण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित झाला असल्यास किंवा अन्य महत्वाची तक्र ार किंवा माहिती देण्यासाठी महावितरणचे संकेतस्थळ, अँप्स येथे महावितरणच्या स्थानिक पातळीवर उपलब्ध १८००१०२३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्र मांकावर काल करावे असे आवाहन जनवीर यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याmahavitaranमहावितरणelectricityवीज