शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मराठी चित्रपट महामंडळाची विभागीय समिती

By admin | Updated: July 31, 2016 16:23 IST

घटना दुरु स्ती, वेतन वाढी संदर्भात आढावा

नाशिक : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नाशिक विभागीय समितीची स्थापना करण्यात आली असून, चित्रपट उद्योगातील फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महामंडळाकडून निर्मात्यांसाठी आचारसंहिता अस्तित्वात आणण्यापासून विविध उपाय योजना करण्यात येणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी दिली.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या दोन दिवसीय शिखर बैठकीत महामंडळाच्या घटना दुरुस्तीविषयी तसेच तंत्रज्ञ व कलाकार यांच्या वेतन वाढीसंदर्भातही आढावा घेण्यात आल्याचे भोसले यांनी पत्र परिषदेत सांगितले. याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक मंडळाची सदस्य अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेता विजय पाटकर, खजिनदार संजय ठुबे, निकिता मोघे, चैत्राली डोंगरे, रंजित जाधव, धनाजी यमकर, विजय पाटकर, सतीश बीडकर, सतीश रणदिवे, पितांबर काळे आदि उपस्थित होते. भोसले म्हणाले, सैराट चित्रपटाच्या यशानंतर विविध ठिकाणी आॅडिशनच्या निमित्ताने फसवणुकीचे प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महामंडळ प्रयत्न करणार आहे. यावेळी विभागीय समितीच्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. यात समिती प्रमुख रवि बारटक्के, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, सुनील ढगे, श्याम लोंढे, सुनील परमार, रवि जन्नावार यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)नाशिकला प्रथमच बैठकचित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या भूमित महामंडळाच्या स्थापनेपासून प्रथमच महामंडळाच्या संचालकांची शिखर बैठक झाली. स्थानिक कलावंतांसोबत महामंडळाच्या कारभाराविषयीही चर्चा करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयासाठी तसेच कलावंत व तंत्रज्ञांना मराठी चित्रपट सृष्टीच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करीत त्यांच्या समास्यांचे निराकरण करण्यासाठी व पारदर्शक कारभार याविषयी बैठकीत चर्चा झाली. मराठी चित्रपटाचा व्यवसाय आणि आवाका वाढू लागल्याने महामंडळाची जबाबदारीही वाढली आहे. नवनिर्वाचित मंडळाच्या सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व चित्रपटसृष्टीतील आॅडिशनच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने निर्मात्यांसाठी विशेष आचारसंहिता निर्माण करण्यात येईल - वर्षा ऊसगावकर, संचालक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ.नशिकमध्ये कार्यालय सुरू करण्याच्या प्रयत्नांना यश आल्याने आणि या कार्यालयाचा कार्यभार पाहण्यासाठी समितीही गठीत झाल्याने विषेश आनंद झाला. स्थानिक कलाकारांसाठी महामंडळ नेहमीच प्रयत्नशील राहील. स्थानिक कलावंत तंत्रज्ञांनीही महामंडळाला मोठे करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. -विजय पाटकर, संचालक अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ.