विभागीय आयुक्तांचे नाशिक जिल्हाधिका-यांच्या कामकाजावर ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 14:41 IST2018-01-29T14:39:13+5:302018-01-29T14:41:48+5:30

नोव्हेंबर महिन्यात विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी विभागीय पातळीवर सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिका-यांची बैठक घेवून शासकीय कामकाजाची नियमावली व प्रशासनात गतीमानता आणण्यासाठी त्रिसुत्री ठरवून दिली होती.

The departmental commissioners of Nashik district collector's work | विभागीय आयुक्तांचे नाशिक जिल्हाधिका-यांच्या कामकाजावर ताशेरे

विभागीय आयुक्तांचे नाशिक जिल्हाधिका-यांच्या कामकाजावर ताशेरे

ठळक मुद्देटपाल, दप्तर तपासणीत दिरंगाई : कडक कारवाईच्या सुचना जिल्हाधिका-यांना धाडलेल्या पत्रात म्हटल्याने पत्राची गंभीरता वाढली

नाशिक : शासकीय कामकाजात पारदर्शकता व जलदगती आणण्यासाठी शासन पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात शासकीय कामकाजात अक्षम्य दिरंगाई व टपाल काढण्यास केले जात असलेल्या दुर्लक्षामुळे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांच्या कामकाजावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी व तलाठ्यांचे कामकाज पाहून अत्यंत क्लेष होत असल्याचेही झगडे यांनी या संदर्भात जिल्हाधिका-यांना धाडलेल्या पत्रात म्हटल्याने पत्राची गंभीरता वाढली आहे.
नोव्हेंबर महिन्यात विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी विभागीय पातळीवर सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिका-यांची बैठक घेवून शासकीय कामकाजाची नियमावली व प्रशासनात गतीमानता आणण्यासाठी त्रिसुत्री ठरवून दिली होती. त्यात दैनंदिन टपाल हातावेगळे करणे, वरिष्ठांच्या पत्रांची तात्काळ दखल घेवून कार्यवाही करणे व दप्तर तपासणी या बाबींना अधिक प्राधान्य देण्याच्या सुचना देतांनाच प्रसंगी प्रत्येक खाते प्रमुखांच्या कार्यालयाची तपासणी करण्याचा इशाराही दिला होता. शासकीय कामकाज आपल्या पद्धतीने चालविणाºया अधिकाºयांना तंबी देतानाच झगडे यांनी ‘कामकाज सुधारा अन्यथा कार्यवाहीला सामोरे जा’ असा निर्वाणीचा अल्टीमेटम दिल्यानंतर काही दिवसांनी उप आयुक्तांकरवी जिल्हाधिकारी कार्यालयाची अचानक तपासणीही करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष कार्यालयांची केलेली तपासणी, तलाठी कार्यालयात जावून तपासलेल्या दप्तर नोंदणीचा अनुभव विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात नमूद केला आहे. त्यात म्हटले आहे की, टपाल शाखेत संगणीकृत टपाल यंत्रणा आहे, परंतु टपाल रजिष्टर, गोषवारा काढण्यात आलेला नाही. तसेच कार्यवाही न झालेल्या टपालाची संख्या जास्त असून, एक ते दोन महिन्यापेक्षा जास्त जुने टपाल मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याचे दिसून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्तीचे टपाल प्रलंबित असल्याने सदरची बाब गंभीर आहे. आपण याबाबत संबंधित शाखेच्या अधिका-यांना बैठकीत विचारणा केल्याचे दिसून येत नाही असा जाबही यापत्रात विचारण्यात आला आहे.
 

Web Title: The departmental commissioners of Nashik district collector's work