शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

नव्या आरक्षणांसाठी टीडीआर देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:54 IST

नव्या विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड तातडीने ताब्यात घेण्यासाठी राज्यशासनाने नियमावलीत इन्सेटीव्ह टीडीआरची आकर्षक घोषणा केली असताना महापालिकेने मात्र या योजनेवर पाणी फेरले आहे.

नाशिक : नव्या विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड तातडीने ताब्यात घेण्यासाठी राज्यशासनाने नियमावलीत इन्सेटीव्ह टीडीआरची आकर्षक घोषणा केली असताना महापालिकेने मात्र या योजनेवर पाणी फेरले आहे. गेल्या दोन वर्षांत यासंदर्भात दाखल झालेल्या तीस प्रकरणांपैकी सात प्रकरणे आत्ता आरक्षित भूखंडांची गरजच नाही या कारणास्तव नाकारण्यात आली असून, त्यामुळे राज्य सरकारच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.  नाशिक महापालिकेच्या यापूर्वीच्या पहिल्या म्हणजे १९९३ ते ९५ या कालावधीत मंजूर विकास आराखड्यात ५२७ आरक्षणे होती. आरखडा अंमलबजावणीच्या वीस वर्षांच्या कालावधीत त्यातील अवघी ३० टक्केआरक्षणे जेमतेम महापालिका ताब्यात घेऊ शकली किंवा संबंधितांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर नव्या विकास आराखड्यात आकर्षक चटई क्षेत्र किंवा टीडीआरच्या पुढे जाऊन क्रेडिट बाँडच्या योजना सुचविण्यात आल्या होत्या. परंतु विकास आराखडा करताना त्यापेक्षा वेगळी योजना मांडण्यात आली त्यानुसार विकास आराखडा तयार झाल्यानंतर पहिल्या वर्षी आरक्षित भूखंड जागामालकाने परत दिल्यास त्यासाठी २० टक्के इन्सेटिव्ह टीडीआर देण्यात येणार आहे. पुढील दुसऱ्या वर्षी टीडीआर दिल्यास १५ टक्के, तिसºया वर्षी दहा टक्के तसेच चौथ्या आणि पाचव्या वर्षी पाच टक्के इन्सेटिव्ह टीडीआर देण्याची तरतूद करण्यात आली आहे. साहजिकच गेल्यावर्षी हा आराखडा भागश: मंजूर झाल्यानंतर आरक्षित भूखंड महापालिकेला देऊन वीस टक्के अतिरिक्त इन्सेटिव्ह टीडीआरचा लाभ घेण्यासाठी आत्तापर्यंत तीस प्रकरणे दाखल झाली आहेत. म्हणजेच जागामालकांनी जागा देण्यासाठी इच्छा प्रदर्शित केली असून, या सर्वांना इरादा पत्र देण्यात आले आहे. त्यातील अटीनुसार अतिक्रमणमुक्त मोकळा भूखंड ठेवणे, त्याला कुंपण घालणे तसेच सातबाºयावर नाव लावून घेणे, अशी पूर्तता करण्यात आली असून, त्यानंतर आता टीडीआर सर्टिफिकेट मिळावे यासाठी फाइली सादर करण्यात आल्या आहेत. मात्र आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही प्रकरणे नाकारण्यास सुरुवात केली आहे व सात फाइलींवर इरादा पत्र रद्द करण्याचा शेरा मारल्याने अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.महापालिकेने इरादा पत्र दिल्यानंतरच संबंधितांनी अटींची पूर्तता केली असून, आता हे इरादा पत्र अंतिम वेळी नाकारल्यास संबंधित मिळकतधारक न्यायालयात जातील अशी नगररचना विभागाच्या अधिकाºयांना भीती असल्याने त्याने शेरा बरहुकूब इरादा पत्र रद्द करण्याची कार्यवाही केली नाही आणि टीडीआरही दिला जात नाही, अशी स्थिती आहे.शहर विकास आराखड्यातील भूखंड तातडीने ताब्यात घेण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून ही सवलत दिली आहे, त्यानुसार आत्ता टीडीआर घेणे सोयीस्कर वाटते अशा विचारांनी संबंधित मिळकतधारक पुढे आले आहेत. परंतु नंतर पुन्हा महापालिकेला गरज वाटेल तेव्हा टीडीआरचे भाव पडले असेल तर जागामालक आर्थिक मोबदला मागतील तेव्हा पालिका काय करणार? हा प्रश्न आहे.घोटाळ्यामुळे आयुक्तांचा निर्णयमहापालिकेत टीडीआर दोनदा लाटण्याचा प्रकार मध्यंतरी आयुक्ततुकाराम मुंढे यांनी उघडकीस आणला होता. त्यातील काही प्रकरणे तपासताना त्यांना त्यात अनेक गंभीर प्रकरणे अडकली होती. त्यामुळे आयुक्तांनी टीडीआर प्रकरणे बाजूला ठेवल्याचे सांगितले जात असून, आता त्यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहेआताच भूखंडाची काय गरजसंबंधित मिळकतधारकांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या सलग दहा एकर शेती क्षेत्रातून रस्ता जात असेल तर त्यातील दहा पैकीमध्येच एखाद्या शेतकºयाची जागा आहे आणि त्याने रस्त्यासाठी आपल्या एक एकर क्षेत्रातील जागा देऊ केली, तर आता एवढ्या मोठ्या दहा एकर भूखंडापैकी मधला एक चतकोर भाग घेऊन काय करू? असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका