डेंग्यूसदृश आजाराने महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: November 25, 2014 00:12 IST2014-11-25T00:11:45+5:302014-11-25T00:12:06+5:30
सत्र सुरूच : तीव्र तापाने मृत्यू झाल्याचा वैद्यकीय सूत्रांचा अहवाल

डेंग्यूसदृश आजाराने महिलेचा मृत्यू
नाशिक : शहरात डेंग्यूसदृश आजाराचे थैमान सुरूच असून, सोमवारी शहरात आणखी एका महिलेचा डेंग्युसदृश आजाराने मृत्यू झाल्याने मृत्यू पावलेल्यांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. या महिनाभरातच एकूण चार व्यक्तींचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला आहे.
सदफ रिझवान शेख (वय २८) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. जुन्या नाशकातील सारडा सर्कल येथे वास्तव्यास असणाऱ्या या महिलेवर गेल्या दोन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी मात्र तीव्र स्वरूपाच्या तापाने या महिलेचे निधन झाल्याचे निदान केले आहे.