शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डेंग्यू, गॅस्ट्रोची साथ

By admin | Updated: September 16, 2014 00:35 IST

जिल्ह्यात डेंग्यू, गॅस्ट्रोची साथ

 

घोटी/इगतपुरी/लासलगाव : जिल्ह्यात डेंग्यु, गॅस्ट्रोची साथ पसरल्याने तळेगाव आणि शिरसगाव येथे महिलांसह एक अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे. साथीच्या आजारांनी थैमान घातले असतांना आरोग्य यंत्रणांनी गांभीर्याने पावले उचलण्याची मागणी होत आहे.तळेगावला गॅस्ट्रोची साथइगतपुरी नगरपालिका हद्दीतील तळेगाव येथे दुषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रो सदृश्य साथीने थैमान घातले असून त्यात एका महिलेचा बळी गेला आहे. या महिलेच्या कुटुंबातील आठ जणांना गॅस्ट्रोची बाधा झाली असून त्यांना ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महिलेचा बळी गेला असतानाही गावात साथ नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.दोन हजार वस्तीच्या तळेगाव येथील जमना गोपाळ रण (वय ४५) या महिलेला ताप, जुलाब व वांत्याचा त्रास होत असल्याने त्यांचा मृत्यू झाला. या वस्तीतील पिंटू संतोष रण, संतोष नथू रण, रु पाली दिलीप चवर, साहिल सुनील वाघ, विनता दिलीप चवर, सावित्री रण, ज्योती रामदास रण व राजू रावजी मुकणे यांनाही साथीची लागण झाल्याने त्यांच्यावर इगतपुरी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत....तर महिला वाचली असतीइगतपुरी तालुक्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्र असून या मार्फत कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांनी पाण्याचे नमुने तपासणी व दुषित असल्याची प्रशासनाला देणे आवश्यक असते. मात्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कर्मचारी गावात प्रत्यक्ष जात नसल्याची तक्रार आहे. कर्मचाऱ्यांनी वेळीच गावात जावून नमुने तपासले असते तर या महिलेचा बळी गेला नसता असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.पाणी दुषीतच, पण साथ नाही : तालुका वैद्यकीय अधिकारीया गावात नळाचे पाणी न आल्याने गावातील दोन कुटुंबांनी गावाजवळच्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले होते. गावात साथ असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाला समजताच गावातील पाणी नमुने तपासले होते. पाणी दुषित असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र महिलेच्या मृत्युनंतर गावात साथ नसल्याचा दावा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पवार यांनी केला आहे.