रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन आरक्षित करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:22 IST2018-10-26T18:22:05+5:302018-10-26T18:22:26+5:30
कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे,

रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन आरक्षित करण्याची मागणी
पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे,
कळवण तालुक्यातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना या पुनंद व चणकापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनवर अवलंबून आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने धरण लाभशेत्रातील व उजव्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहणाº्या गावांना पिण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यावर्षी पाऊस अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली असून नाले ओढ कोरड्याठाक पडल्या आहेत.
पिकांना व पिण्याच्या पाण्याचा भीषण टंचाई जाणवणार आहे, चणकापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन पाळे, मानूर ,भेंडी, निवाणे, दह्याने, कळवण खु आदी गावासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण व पुनंद धरणातून सुळे उजवा व डावा काळ्यवातून रब्बी हंगामा साठी तीन आवर्तन नियोजित करून उन्हाळयात पिण्याच्या पाण्यासाठी एक व आवश्यक भासल्यास दुसरे आवर्तनाचे नियोजन करून पाणी राखीव ठेवण्यात यावे अशी मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार जे पी गावित, मोहन जाधव, हेमंत पाटील, बाळासाहेब गागुर्डे, नाना देवरे, हरी पाटील, अविनाश शेवाळे, अजय पगार, अविनाश शेवाळे, वैभव जाधव, रवी गुंजाळ, राजू बागुल, ज्योतिराव शेवाळे, राकेश वाघ, नाथू आहेर आदी शेतकरी उपस्थित होते.