वाहने लावण्यासाठी जागा देण्याची मागणी
By Admin | Updated: July 17, 2017 00:47 IST2017-07-17T00:47:14+5:302017-07-17T00:47:27+5:30
ंमालेगाव : खुल्या मोकळ्या जागेवर अवजड वाहने लावण्यासाठी व पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र ट्रक चालक-मालक संघटनेतर्फे मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

वाहने लावण्यासाठी जागा देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : शहरातील आग्रारोडवर खुल्या मोकळ्या जागेवर अवजड वाहने लावण्यासाठी व पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र ट्रक चालक-मालक संघटनेतर्फे मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात मोठ्या प्रमाणात कापड व्यवसाय असून, परराज्यातून असंख्य वाहने येत असतात. वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते. रस्त्यात वाहने लावल्यास त्याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शिवाय गाडी चोरी होण्याचीही शक्यता असते. यामुळे शहरातील गट नं. ७२ जुना आग्रारोड येथे खुल्या असलेल्या जागेवर वाहने लावण्यासाठी शासनाने जागा द्यावी. गेल्या वर्षी मोहंमद अली रस्त्यावर वाहतुकीच्या कारणामुळे दुर्घटना घडून १४ वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले होते. याबाबत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार आसिफ शेख, जिल्हाधिकारी, प्रांताधिकार, महापौर, अपर पोलीस अधीक्षक यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. निवेदनावर ताहीर बेग मिर्झा, शेख निसार उस्मान यांच्या सह्या आहेत.