बोगस बियाणांप्रकरणी चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 18:47 IST2020-08-24T18:47:14+5:302020-08-24T18:47:39+5:30
इगतपुरी : तालुक्यातील मुरंबी येथील शेतकरी विशाल मते यांनी दोन महिन्यांपूर्वी दोडक्याचे बियाणे वाडीवºहे येथील एका कृषी बियाणे विक्र ी केंद्रातून घेतले होते. त्या बियाणाने अद्यापही फळ आले नसल्याने बियाणे घेतलेल्या कंपनीकडे तक्र ार केली.

बोगस बियाणांप्रकरणी चौकशी करण्याची मागणी
इगतपुरी : तालुक्यातील मुरंबी येथील शेतकरी विशाल मते यांनी दोन महिन्यांपूर्वी दोडक्याचे बियाणे वाडीवºहे येथील एका कृषी बियाणे विक्र ी केंद्रातून घेतले होते. त्या बियाणाने अद्यापही फळ आले नसल्याने बियाणे घेतलेल्या कंपनीकडे तक्र ार केली. मात्र कंपनीने कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांना चौकशीबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी राहुल मते, कचरू बागुल आदी शेतकरी उपस्थित होते.
फोटो : कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांना निवेदन देताना राहुल मते, कचरू बागुल, बाळासाहेब घुमाळ आदी. (24इगतपुरी2)