सटाण्यात पोलीस कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:18 IST2020-09-24T19:21:33+5:302020-09-25T01:18:58+5:30

सटाणा : येथील पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या ७२ गावांतील सुमारे दोन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या ३२ पोलिसांना सांभाळावी लागत आहे.

Demand for increase in police personnel in Satna | सटाण्यात पोलीस कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी

सटाण्यात पोलीस कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी

ठळक मुद्देसटाणा पोलीस ठाण्यात १५ नवीन पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्याबाबत सांगितले.

सटाणा : येथील पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या ७२ गावांतील सुमारे दोन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या ३२ पोलिसांना सांभाळावी लागत आहे. पोलीस ठाणे निर्मितीपासून मंजूर असलेल्या पदांमध्ये एकदाही वाढ न झाल्याने झपाट्याने वाढलेल्या लोकसंख्येसाठी पोलिसांची संख्या अत्यंत तोकडी असून, कायदा सुव्यवस्था राखताना कसरत करावी लागते. यामुळे सटाणा पोलीस ठाण्यात नवीन पोलीस कर्मचाऱ्यांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरागध्यक्ष विजयराज वाघ यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस महानिरीक्षक दिघावकर यांनी पोलीस अधीक्षक पाटील यांच्याशी संपर्क साधून सटाणा पोलीस ठाण्यात १५ नवीन पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्याबाबत सांगितले. यावेळी वाघ यांच्यासमवेत माजी नगरसेवक फईम शेख, अल्ताफ कादर, प्रीतेश जाधव आदी उपस्थित होते.
 

Web Title: Demand for increase in police personnel in Satna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.