उशिरापर्यंत चालणाऱ्या मद्य दुकानांवर कारवाईची मागणी

By Admin | Updated: July 30, 2014 00:18 IST2014-07-29T23:04:14+5:302014-07-30T00:18:07+5:30

उशिरापर्यंत चालणाऱ्या मद्य दुकानांवर कारवाईची मागणी

Demand for action at liquor shops running late | उशिरापर्यंत चालणाऱ्या मद्य दुकानांवर कारवाईची मागणी

उशिरापर्यंत चालणाऱ्या मद्य दुकानांवर कारवाईची मागणी

नाशिकरोड : शहरात मध्यरात्री उशिरापर्यंत देशी-विदेशी दारू दुकाने व बिअर बार खुले राहत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भारिप-बहुजन महासंघ यांच्या वतीने नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहर परिसरात मध्यरात्री उशिरापर्यंत अनधिकृतपणे देशी-विदेशी दारू दुकान व बिअर बार खुले राहतात. यामुळे वाद-विवाद, मारामाऱ्या व अनुचित घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगार प्रवृत्तीचे इसम बिअर बार आदि ठिकाणी रात्री उशिरापर्यंत आपला वेळ घालवतात. त्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा घटना घडवितात. त्यामुळे अनधिकृतपणे रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या दारू दुकान व बिअर बारवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर शहराध्यक्ष विश्वनाथ भालेराव, कार्याध्यक्ष भिमचंद्र
चंद्रमोरे, सुरेश पारखे, बाळासाहेब घायवटे, संजय वाघमारे, आशिष थोरात, जहांगिर शेख, दीपक
भालेराव, अशोक सोनकांबळे, पप्पू घोडके आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांना निवेदन देतांना मनोहर रुपवते, अ‍ॅड. राजेंद्र चंद्रमोरे, निखिल सोनवणे, भिका गांगुर्डे, संदीप चंद्रमोरे, दीपक जाधव, निंबा खरात, अमोल भालेराव, भागवत शिरसाठ, पप्पू घोडके आदि.

Web Title: Demand for action at liquor shops running late