शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

कस्तुरीसाठी हरणाची हत्या, नरबळीचाही संशय; भोंदूबाबा अशोक खरातचे 'प्रताप'; सरकारी वकिलांनी कोर्टात पाढाच वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:43 IST

Ashok Kharat: अशोक खरात या भोंदूला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासातून जी माहिती मिळाली, ती न्यायालयाला सांगितली. 

'अशोक खरात हा महिलांना पाणी प्यायला द्यायचा. महिलांना जाळ्यात ओढायचा. तो स्वतः सिद्ध पुरुष असल्याचे सांगून महिलांवर अत्याचार करत होता. त्याने पाच नरबळी दिल्याचा संशय आहे. त्याच्या फार्महाऊसवर गोळीबार करण्यात आलेली रिकामी काडतुसे मिळाली आहेत. ती त्याने कुठे वापरली याचाही तपास करायचा आहे', अशी धक्कादायक माहिती नाशिक पोलिसांनी न्यायालयात दिली. अशोक खरात याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी त्याने केलेले प्रताप न्यायालयात सांगितले. दरम्यान, न्यायालयाने सुनावणीअंती खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, अशोक खरात हा स्वतःला सिद्धपुरुष सांगून महिलांची फसवणूक करत होता. खरात याच्या काही प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्याचा आम्ही अभ्यास करत आहोत.

अशोक खरातच्या घरात काय काय सापडले?

अशोक खरातच्या घरात ६ लाख ५३ हजार इतकी रोख रक्कम, लॅपटॉप, काळ्या रंगाची रिव्हॉल्व्हर आणि राजमुद्रा, ३१ काडतुसे अशा वस्तू सापडल्या आहेत, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.   मधामध्ये गुंगीचे पदार्थ मिसळून अशोक खरात महिलांचे शोषण करायचा. महिलांच्या पूजा विधी मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी असायच्या. हरणाची काळी आणि कस्तुरी, तो कस्तुरी कुठून मिळवायचा, त्याचा शोध घ्यायचा आहे. तो ज्या वस्तू वापरत होता, त्याचा तपास करायचा आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांनी खरातला ७ दिवसांची कोठडीची मागणी केली.

काही पेन ड्रॉईव्ह आणि डिजिटल डेटा एसआयटीच्या हाती लागला आहे. अशोक खरात याने पाच नरबळी दिल्याचा संशय आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.  न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake godman Ashok Kharat arrested for murder, sexual assault.

Web Summary : Ashok Kharat, posing as a holy man, allegedly sexually assaulted women and may have committed five human sacrifices. Police found weapons, cash, and drugs at his home.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCourtन्यायालय