रेल्वेतून पडल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:15 IST2018-08-22T14:14:21+5:302018-08-22T14:15:55+5:30
नाशिक : अपलाइनच्या रेल्वे लाइनवर धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़२१) दुपारच्या सुमारास घडली़ शिवाजी ज्ञानदेव भागवत (२४, रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़

रेल्वेतून पडल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू
नाशिकरोड : अपलाइनच्या रेल्वे लाइनवर धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़२१) दुपारच्या सुमारास घडली़ शिवाजी ज्ञानदेव भागवत (२४, रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास काशी एक्स्प्रेसच्या (गाडी नंबर १५०८ अप) चालकाने नाशिकरोडचे उपस्टेशन प्रबंधक राजेंद्र गरुड यांना रेल्वे लाइनवरील १८८/६ या खांबाच्या अप रोडच्या रेल्वे लाइनच्या बाजूला तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली़ या माहितीनंतर रेल्वे पोलीस व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या खिशात एक मोबाइल व आधार कार्ड आढळून आले़ मोबाइल खराब झाल्याने आधार कार्डच्या मदतीने पोलिसांनी नातेवाइकांचा शोध घेतल्यानंतर मृत्यू झालेला तरुण शिवाजी भागवत असल्याचे समोर आले़
रेल्वेने प्रवास करीत असताना खाली पडून गंभीर जखमी झाल्याने भागवतचा मृत्यू झाल्याचे नाशिकरोड पोलिसांनी सांगितले़ दरम्यान, या अपघाताची नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़