धरणात उतरलेल्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:56 IST2018-08-20T00:56:20+5:302018-08-20T00:56:36+5:30
अंघोळीसाठी धरणात उतरलेल्या एका तरुणाचा गाळात पाय फसल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी दसाणा (ता. बागलाण) येथे घडली. वैभव संजय सोनवणे (१९) असे या तरुणाचे नाव असून, तो दसाणा येथील रहिवासी आहे.

धरणात उतरलेल्या तरुणाचा मृत्यू
वीरगाव : अंघोळीसाठी धरणात उतरलेल्या एका तरुणाचा गाळात पाय फसल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी दसाणा (ता. बागलाण) येथे घडली. वैभव संजय सोनवणे (१९) असे या तरुणाचे नाव असून, तो दसाणा येथील रहिवासी आहे. येथील लघुमध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दसाणा येथील तीन युवक पोहण्यासाठी गेले होते. यातील वैभव सोनवणे हा गाळात रु तल्याने तो बुडू लागला. यावेळी अन्य दोन साथीदारांनी प्रयत्न करूनही त्याला वाचविता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सटाणा पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम सुरू केली आहे.