शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

अपघातातील जखमी  दाम्पत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 1:26 AM

सिन्नर-नाशिक महामार्गावरील उद्योग भवनजवळील साईराज पेट्रोल पंपासमोर कंटेनरने धडक दिल्याने अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवार (दि. १३) रोजी नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात पती-पत्नी जखमी झाले होते. त्यानंतर उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

सिन्नर : सिन्नर-नाशिक महामार्गावरील उद्योग भवनजवळील साईराज पेट्रोल पंपासमोर कंटेनरने धडक दिल्याने अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवार (दि. १३) रोजी नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात पती-पत्नी जखमी झाले होते. त्यानंतर उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.  येथील उद्योग भवन परिसरात राहणारे सुरेंद्र महादेव शिंगोटे (वय ३५, मूळ रा. मलकापूर, जळगाव) हे माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एचएनजी कारखान्यात रोजंदारीवर कामाला होते. मुलगा तेजस याची तब्येत बरी नसल्याने ते शनिवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी सकाळी ९ च्या दरम्यान शेजारी राहणाºया वाघ यांची दुचाकी(क्र. एम. एच. १५ ई. वाय. ५८३६) घेऊन ते पत्नी उषा (३४) मुलाला घेऊन दवाखान्यात जाण्यास निघाले. साईराज पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून ते सिन्नरकडे जाण्यासाठी वळत असताना नाशिककडून भरधाव येणाºया कंटेनर (क्र. एच. आर. १३, एम.१३५५)ने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. या दुचाकीचा अपघातात चक्काचूर झाला. मात्र मुलगा तेजस आश्चर्यकारक बचावला होता.परिसरातील रहिवाशांनी तातडीने जखमींना नाशिकला हलविले. उपचार सुरू असताना उषा यांचे दुपारी ३ च्या सुमारास निधन झाले, तर सुनील यांची मृत्यूशी झुंज सुरू असताना रविवार (दि.१४) रोजी मृत्यू झाला. पोलिसांनी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास हवालदार निरगुडे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू