भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 17:42 IST2018-09-05T17:40:38+5:302018-09-05T17:42:28+5:30

नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़४) सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधामजवळ असलेल्या कुणाल हॉटेलसमोर घडली़ अशोक माधव कांगणे (२८, रा. हनुमाननगर, आग्रारोड, पंचवटी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

 The death of the car in the shock of a fierce car | भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

ठळक मुद्दे कुणाल हॉटेलसमोर अपघातपंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा

नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़४) सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधामजवळ असलेल्या कुणाल हॉटेलसमोर घडली़ अशोक माधव कांगणे (२८, रा. हनुमाननगर, आग्रारोड, पंचवटी) असे अपघातातमृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अशोक कांगणे हा मुंबई- आग्रा महामार्गावरील हॉटेल कुणालच्या समोरून जात होता. यावेळी भरधाव आलेल्या कारने (एमएच १९, डीजे ५००६) अशोक कांगणे याला जोरदार धडक दिली़ या धडकेमध्ये अशोकचे डोके व पायास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला तर घटनेनंतर कारचालक फरार झाला़

या अपघात प्रकरणी मयत अशोकचे काका भिकाजी कांगणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे़

Web Title:  The death of the car in the shock of a fierce car