दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एकचा मृत्यू

By Admin | Updated: April 5, 2017 16:26 IST2017-04-05T16:26:38+5:302017-04-05T16:26:38+5:30

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगरमध्ये दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्

Death of a bike in front of a bike | दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एकचा मृत्यू

दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एकचा मृत्यू

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगरमध्ये दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़४) दुपारच्या सुमारास घडली़ प्रशांत परमेश्वर पती (३५, रा़ सराफनगर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगन्नाथ मंदिराचे पुजारी प्रशांत परमेश्वर पती हे मंगळवारी (दि़४) नेहमीप्रमाणे पूजाविधी आटोपून दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच १५, एफपी ६४९३) जात होते़ त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या दुचाकीने (एमएच १५, एफपी ७४११) प्रशांत पती यांना जोरदार धडक दिली़ यामध्ये प्रशांत पती यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक कैलास घुगे (रा़ चेतनानगर) यांनाही दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या अपघाताची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Death of a bike in front of a bike