मालेगावच्या आंदोलकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:45 IST2018-11-17T01:45:31+5:302018-11-17T01:45:50+5:30
किसान सभेच्या आंदोलनासाठी नाशिकमध्ये आलेल्या आंदोलनकर्त्या इसमाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गोल्फ क्लब मैदान परिसरात घडली़ अशोक खैरनार (रा़ झाडी) असे मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्याचे नाव आहे़

मालेगावच्या आंदोलकाचा मृत्यू
नाशिक : किसान सभेच्या आंदोलनासाठीनाशिकमध्ये आलेल्या आंदोलनकर्त्या इसमाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गोल्फ क्लब मैदान परिसरात घडली़ अशोक खैरनार (रा़ झाडी) असे मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्याचे नाव आहे़
बुधवारी नाशिक शहरात किसान सभेचे आंदोलन होते़ या मोर्चामध्ये अशोक खैरनार हे सहभागी झाले होते़ मोर्चा संपल्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ते गोल्फ क्लब मैदानाच्या प्रवेशद्वारावर उभे असताना अचानक चक्कर येऊन पडले. मित्र राजाराम आहिरे यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ या घटनेची मुंबईनाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.