शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

नेमाडे यांच्या हस्ते दत्ता पाटील यांचा सत्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST

नाशिक : लोककला, लोकपरंपरा समाजाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाच्या भूमिका बजावतात. त्यामुळे त्या जपल्या पाहिजेत. त्यातूनच कला आणि समाजजीवन यातील संवाद ...

नाशिक : लोककला, लोकपरंपरा समाजाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाच्या भूमिका बजावतात. त्यामुळे त्या जपल्या पाहिजेत. त्यातूनच कला आणि समाजजीवन यातील संवाद समृद्ध होत जाईल. ‘हंडाभर चांदण्या’च्या माध्यमातून दत्ता पाटील यांच्यासारख्या लेखकाने केलेला हा प्रयत्न म्हणूनच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कारविजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केले.

जळगाव येथील परिवर्तन व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवा’त नाटककार दत्ता पाटील यांचा नेमाडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील गांधी रिसर्च फाउंडेशन येथे संपन्न झालेल्या या महोत्सवात नाट्यलेखन क्षेत्रात अभिनव कार्य केल्याबद्दल उद्घाटनाच्या दिवशी नाटककार दत्ता पाटील यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. परिवर्तनचे शंभू पाटील म्हणाले, की नाट्यलेखनाचे केंद्र हे पुणे, मुंबईतून सरकत उत्तर महाराष्ट्रात स्थिरावल्याचे दिसते. त्याचे श्रेय दत्ता पाटील यांना जाते. त्याचा आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, आमदार राजू भोळे, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड उपस्थित होते. यावेळी अशोक जैन यांच्या हस्ते प्रमोद गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दत्ता पाटील यांनी जळगावमधील परिवर्तनाची ही सांस्कृतिक चळवळ ग्रामीण भागातील नव्या पिढीच्या मनात नाट्यपरंपरेबद्दलची नवी उत्सुकता जागवणारी असल्याचे सांगितले. मंजूषा भिडे यांनी मानपत्राचे वाचन केले.

------------------------------

फोटो कॅप्शन : (२२ दत्ता पाटील)

ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते नाटककार दत्ता पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, आमदार राजू भोळे, परिवर्तनचे शंभू पाटील, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड.