सीसीटीव्हीसह सुरक्षा रक्षकाला हुलकावणी देत कंपनीत पाच लाखांची धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 19:07 IST2021-06-25T19:04:01+5:302021-06-25T19:07:12+5:30

सातपूर औद्योगिक वसाहतीतील उज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्स कंपनीत गुरुवारी (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत कंपनीतील पाच लाख रुपयांच्या रोख रकमेसह तिजोरीच गायब केल्याची घटना समोर आली आहे.

Daring theft of Rs 5 lakh from company by evading security guard with CCTV | सीसीटीव्हीसह सुरक्षा रक्षकाला हुलकावणी देत कंपनीत पाच लाखांची धाडसी चोरी

सीसीटीव्हीसह सुरक्षा रक्षकाला हुलकावणी देत कंपनीत पाच लाखांची धाडसी चोरी

ठळक मुद्देसातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत चोरीचोरट्यांनी लांबवली पाच लाख रुपयांची रोकडसीसीटिव्ही बंद करून रोकडेसह तिजोरीच केली गायब

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील उज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्स कंपनीत गुरुवारी (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत कंपनीतील पाच लाख रुपयांच्या रोख रकमेसह तिजोरीच गायब केल्याची घटना समोर आली आहे. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी कंपनीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद करुन डिव्हीआर व हार्डडिस्क सोबत घेऊन जात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे कंपनी परिसरात २४ तास सुरक्षारक्षक नेमलेला असताना ही धाडसी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीत उज्वल भारत नावाचा कारखाना आहे. या कारखान्यांतर्गत एमडी ट्रेडर्सचे काम चालते. प्लास्टिक प्रिंटिंगसह पोल्ट्री व्यवसायाला लागणारे खाद्य (ट्रेडिंग) आणि ब्रॉइलर कल्ल बर्डस या कंपनी मार्फत पुरवली जाते. कंपनीचे संचालक दीपक आव्हाड नेहमीप्रमाणे कंपनीचे कामकाज आटोपून गुरुवारी (दि.२४) रात्री ८ वाजता घरी गेले होते. शुक्रवारी सकाळी कंपनीत गेले असता ऑफिसमधील लॉकर व त्यातील पाच लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले. यावेळी कंपनी परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे उलट्या दिशेने फिरवलेले तर काही कॅमेऱ्यांचे कनेक्शन तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. विशेष म्हणजे ऑफिसमध्ये दोन लॅपटॉप असतांना त्यांना हात न लावता तसेच कुठल्या प्रकारची तोडफोड न करता ही चोरी केली आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक सुखदेव काळे यांच्यासह फिंगरप्रिंट तज्ज्ञ व श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले असून कंपनीच्या मागील बाजूतील खिडकीतून तिजोरी फेकून चोरट्यांनी पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कंपनीचे संचालक दीपक आव्हाड यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Web Title: Daring theft of Rs 5 lakh from company by evading security guard with CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.