शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाड्यांचे झाले विदारक दर्शन

By admin | Updated: September 11, 2015 23:11 IST

खतप्रकल्पावर गोलमाल : स्थायी समिती सभापतींचा दौरा

नाशिक : सिडकोत गुरुवारी नेहा ठाकरे या दहा वर्षांच्या मुलीचा घंटागाडीखाली चिरडून मृत्युमुखी पडण्याच्या घटनेनंतर स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी शुक्रवारी केलेल्या पाहणी दौऱ्यात त्यांना घंटागाड्यांचे विदारक दर्शन घडले. रस्त्यांवर दोन-तीन ठिकाणी बंद पडलेल्या घंटागाड्या, अनेक गाड्यांची दुरवस्था पाहून सभापतींनी संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्याधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, खतप्रकल्पावरही सभापतींना गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये गोलमाल आढळून आल्याने त्यांनी आरोग्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. सिडकोतील घटनेनंतर घंटागाड्यांच्या एकूणच स्थितीबद्दल गुरुवारच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी संबंधित ठेकेदारासह आरोग्य विभागाला दोषी धरले होते. सभापती शिवाजी चुंभळे यांनी या घटनेबद्दल सिडकोतील स्वच्छता निरीक्षक रमेश गाजरे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते याशिवाय आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना शुक्रवारी सर्वच्या सर्व घंटागाड्यांना एकत्र आणून ठेवण्याचे आदेश देत त्यांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह समितीचे सदस्य यशवंत निकुळे, शैलेश ढगे यांनी खतप्रकल्पावर धडक देत तेथे हजर असलेल्या घंटागाड्यांची स्थिती जाणून घेतली. यावेळी घंटागाड्यांची अवस्था पाहून सभापतींनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. खतप्रकल्पावर घंटागाड्यांच्या होणाऱ्या फेऱ्यांबाबतचे रजिस्टरही सभापतींनी तपासले असता एकाच क्रमांकाची गाडी चार तासांच्या अंतराने दोन वेळा फेऱ्या मारत असल्याचा गोलमालपणाही सभापतींच्या निदर्शनास आला. विशेष म्हणजे १७१ घंटागाड्या असताना त्यातील १२७ गाड्याच खतप्रकल्पावर येऊन गेल्याची नोंद आढळून आली, तर ४४ घंटागाड्या आल्याच नसल्याचे लक्षात आले. त्याचबरोबर खतप्रकल्पावर कोट्यवधी रुपयांची मशिनरी, वाहने बेवारस स्थितीत गंजलेल्या स्थितीत पडून असल्याचे पाहताच सभापतींनी आरोग्याधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर सभापतींनी कन्नमवार पुलाजवळील महापालिकेच्या डेपोत असलेल्या घंटागाड्यांचीही पाहणी केली असता तेथेही घंटागाड्यांचे विदारक दर्शन घडले. या साऱ्या प्रकाराबाबत खेद व्यक्त करत सभापतींनी संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.