शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

रात्री बारापर्यंत रंगला दांडिया ; तरुणाईच्या उत्साहाला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:37 AM

नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून, मंगळवारी (दि.१६) रात्री बारापर्यंत दांडियाचा आवाज घुमला. याबरोबरच सामूहिकरीत्या गरब्याचा उत्साह सळसळता असल्याचे पहावयास मिळाले. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले असून तरुणाईचा आनंद शिगेला पोहचला होता.

नाशिक : नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून, मंगळवारी (दि.१६) रात्री बारापर्यंत दांडियाचा आवाज घुमला. याबरोबरच सामूहिकरीत्या गरब्याचा उत्साह सळसळता असल्याचे पहावयास मिळाले. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले असून तरुणाईचा आनंद शिगेला पोहचला होता.  नवरात्रोत्सवानिमित्त शहर व परिसरात सार्वजनिक मंडळांनी दहादिवसीय विविध दांडिया उत्सव कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पंचवटी, जुने नाशिकसह गंगापूररोड सिडको, इंदिरानगर भागात दांडिया रास, गरब्याचा सांस्कृतिक उत्सव सोहळा रंगलेला पहावयास मिळत आहे. मंगळवारी तरुणाईच्या उत्साह ओसंडून वाहताना दिसून येत होता. पारंपरिक पोशाख परिधान करून तरुण-तरुणींकडून जल्लोषपूर्ण वातावरणात ठिकठिकाणी दांडिया व गरब्याचा आनंद लुटला गेला. बुधवारी (दि.१७) रास दांडियाचा समारोप होणार असून सार्वजनिक उत्सवाची सांगता होईल.गुरुवारी सर्वत्र विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तरुणाईचा उत्साह सळसळता होता. सर्वच ठिकाणी गरबा, दांडियाचा आनंद घेण्यासाठी गर्दी लोटली होती. त्यामुळे गरब्याचा सामूहिक खेळ चांगलाच रंगात आल्याचे दिसून आले. सर्वत्र आनंद, उत्साह आणि दांडिया, गरबा नृत्याची धम्माल नजरेस पडत आहे. संध्याकाळी सात वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत दांडिया, गरबा नृत्याचा तरुणाईने गरब्याचा आनंद लुटला. जुने नाशिक, सिडको, गंगापूररोड, इंदिरानगर, पंचवटी, कॉलेजरोड आदी भागांमध्ये सार्वजनिकरीत्या दांडिया व गरब्याचा सोहळ्याला रंग चढला होता.पंचवटी, मखमलाबादमध्ये धम्मालपंचवटीमधील कच्छी लोहाणा महाजनवाडी, आई सप्तशृंगी मित्रमंडळ, ओम साई कला क्रीडा मंडळ, दुर्गा फ्रेण्ड सर्कल, दत्ता मोगरे बहुद्देशीय संस्था, सरदार चौक मित्रमंडळ, कृष्णनगर मित्रमंडळ, अयोध्यानगरी सांस्कृतिक मंडळ, नवीन आडगावनाका मित्रमंडळाच्या वतीने दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्वच ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गर्दी पहावयास मिळाली. मखमलाबाद गावातील स्थानकावर नवरात्रोत्सव छत्रपती बॉईज ग्रुपच्या वतीने साजरा केला जात आहे. या ठिकाणी दांडिया-गरब्याची रात्री उशिरापर्यंत धम्माल पहावयास मिळाली. ग्रामीण भागाचा बाज टिकून असल्यामुळे येथील गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता.इंदिरानगरला महिलांनी धरला ठेकाइंदिरानगर परिसरात महिलांसाठी खास रथचक्र चौकातील अजय मित्रमंडळ, चेतनानगरला बाजीराव फाउंडेशनच्या वतीने रास दांडिया खेळला जात आहे. मागील दहा दिवसांपासून या ठिकाणी परिसरातील महिलांकडून सामूहिक गरबा नृत्याचा आनंद लुटला जात आहे. मंगळवारी रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत महिलांनी ठेका धरत धम्माल केली.

टॅग्स :GarabaGarabaNavratriनवरात्री