शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

नृत्य, अभिनयातून उलगडले ‘ती’चे अवकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:04 AM

पावसाच्या सरींनंतर वातावरणात आलेला गारवा, नाशिककर कलाकार महिलांकडून सादर होत असलेले सहजसुंदर नाटक, त्याला तितक्याच दमदारपणे मिळत असलेली संगीतसाथ, नाटकाच्या संवाद, अभिनय आदींमधून व्यक्त होत असलेले भाव यामुळे रसिक श्रोते भारावून गेले होते.

नाशिक : पावसाच्या सरींनंतर वातावरणात आलेला गारवा, नाशिककर कलाकार महिलांकडून सादर होत असलेले सहजसुंदर नाटक, त्याला तितक्याच दमदारपणे मिळत असलेली संगीतसाथ, नाटकाच्या संवाद, अभिनय आदींमधून व्यक्त होत असलेले भाव यामुळे रसिक श्रोते भारावून गेले होते. निमित्त होते, ‘ती अवकाश, आकाश’चे. जनस्थान फेस्टिव्हलअंतर्गत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला.मराठी रंगभूमीवरील स्त्रियांचा प्रवास या नाटकातून अभिनवपणे रेखाटण्यात आला. ज्येष्ठ नृत्यांगना विद्या देशपांडे, कीर्ती भवाळकर व सुमुखी अथणी यांच्या नृत्याने नाटकास प्रारंभ झाला. निवेदनावर आधारित नृत्य सादर करीत अनादी काळापासून चालत आलेला व आजही महिलांमध्ये असणारा आत्मविश्वास, स्त्रीशक्ती यांचे सादरीकरण त्यांनी नृत्यातून केले. त्यानंतर पल्लवी पटवर्धन, अपर्णा क्षेमकल्याणी यांनी परदेशातील महिला परिषदेत सहभागी होणाऱ्या दोन भारतीय स्त्रिया व त्यांचे भारतीय महिला सक्षमीकरणाच्या सद्यस्थितीचे चित्रण आपल्या संवादाद्वारे सादर केले. त्याचेच सूत्र गुंफत ‘शारदा’ नाटकातील काही प्रसंग अभिनेत्री अदिती मोराणकर, गायिका प्रांजली बिरारी यांनी सादर केले. या नाटकातील शारदेचे श्रीमंताघरी ठरलेले लग्न, उपवर मुलगा म्हातारा असल्याने नाराज झालेली व आपली नाराजी गाण्यांमधून सादर करणारी शारदा, सत्यस्थिती समजल्यावर मुलीच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी तिची आई असा प्रसंग यावेळी प्रभावीपणे सादर करण्यात आला. त्यानंतर मराठी रंगभूमीवरील आजवरचा स्त्रीशक्तीच्या प्रचितीचा प्रवास नृत्य, नाट्य, अभिनयाद्वारे सादर करण्यात आला.  रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने व वन्समोअरने सभागृह दणाणून गेले होते. यात विद्या करंजीकर, हेमा जोशी, नेहा जोशी, अर्चना निपाणकर, धनश्री क्षीरसागर, रेखा केतकर, लक्ष्मी पिंपळे, श्रेया जोशी, प्रिया तुळजापूरकर, रागिणी कामतीकर आदींनी प्रभावीपणे विविध भूमिका निभावल्या. या नाटकाचे दिग्दर्शन सुनील देशपांडे यांनी केले. सुभाष दसककर, नितीन पवार, नितीन वारे यांनी संगीतसाथ केली. आनंद ढाकीफळे यांचे नेपथ्य, तर प्रकाशयोजना विनोद राठोड व ईश्वर जगताप यांची होती. वेशभूषा स्नेहल एकबोटे यांची, तर रंगभूषा माणिक कानडे, ललित निकम यांनी केली होती. अपर्णा क्षेमकल्याणी यांनी निवेदन केले. कार्यक्रमास रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक