शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी आदिवासी तरुण कमावू लागला लाखो रुपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 17:44 IST

नाशिक : दुसऱ्याच्या शेतात रोजावर काम करणा-या आदिवासी तरुणाने मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन आणि कृषी विभागाच्या योजनांचा आधार घेऊन आपली प्रगती साधली असून, आपल्या मेहनतीच्या जोरावर आज त्याला २० गुंठे क्षेत्रातून वर्षाकाठी पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

नाशिक: दुसऱ्याच्या शेतात रोजावर काम करणा-या आदिवासी तरुणाने मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन आणि कृषी विभागाच्या योजनांचा आधार घेऊन आपली प्रगती साधली असून, आपल्या मेहनतीच्या जोरावर आज त्याला २० गुंठे क्षेत्रातून वर्षाकाठी पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यातील साप्ते गावातील किशोर पवार या आदिवासी तरुणाने ही किमया साधली आहे. मूळचा तालुक्यातीलच देवडोंगरा येथील रहिवासी असलेल्या किशोरच्या घरची स्थिती बेताची असतानाही त्याने मुक्त विद्यापीठातून बीएस्सी अ‍ॅग्रीची पदवी मिळविली. वडील मुक्त विद्यापीठात रखवालदार म्हणून नोकरीस असताना त्यांच्याकडून त्यांना कृषी विज्ञान केंद्राची आणि तेथे चालणा-या अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. याठिकाणी त्याने नर्सरी ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतला या अभ्यासादरम्यान विविध ठिकाणी भेटी दिल्या. नर्सरीची माहिती घेतली. यानंतर बरेच दिवस तो गिरणारे येथील एका नर्सरीत रोजाने कामही करत होता. नर्सरीची माहिती मिळाल्यानंतर आपण स्वत:च काहीतरी करावे या उद्देशाने त्याने सुरुवातीला साप्ते येथे २० गुंठे क्षेत्रावर साध्या लाकडी बल्ल्या आणि हिरवी जाळी वापरून नर्सरी सुरू केली. परिसरात नर्सरी नसल्यामुळे त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला यातून त्याचाही उत्साह वाढला. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रथम त्याने शेततळ्याची निर्मिती केली. त्यानंतर परिसरातील हवामानाचा विचार करून टनल पॉलहाउस उभे केले. यासाठी कृषी विभागाकडून त्याला ६ लाख रुपयांचे अनुदान मिळाले. काही बॅँकेचे कर्ज उचलून खर्चाची तोंड मिळवणी केली. या पॉलीहाउसमध्ये सध्या किशोर विविध भाजीपाल्यांची रोपे तयार करतो. त्याला परिसरातील शेतक-यांकडून चांगली मागणी आहे. यामुळे अल्पावधीतच त्याची भरभराट झाली. 

 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती