इंधनबचतीच्या संदेशासाठी सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 12:08 IST2020-01-18T12:05:37+5:302020-01-18T12:08:21+5:30
मातोश्री रमाबाई महिला मंडळ व नेहरू युवा केद्र संयुक्त विद्यमाने नुतन विध्या मंदिर शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सायकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते

इंधनबचतीच्या संदेशासाठी सायकल रॅली
नाशिक : भगुर येथील मातोश्री रमाबाई महिला मंडळ व नेहरू युवा केद्र संयुक्त विद्यमाने नुतन विध्या मंदिर शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सायकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष भारती साळवे यांनी रॅली धारकांना सायकलमुळे होणारा शारिरीक व्यायाम आणि इंधन बचत व पर्यावरण संरक्षण यांचे महत्त्व सांगितले. त्यानंतर शाळेतील शिक्षक विजय आहेर, बाळासाहेब केदारे, हरी पवार, सचिन गायकवाड, सचिन सागळे, निलेश गोसावी यांच्यासह विध्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून गावात फिरवत इंधन बचतीसाठी सायकलाचा वापर करण्याचा संदेश दिला. यावेळी इंदिरा पवार, ममता साळवे, लता साळवे, छाया भवार, भारती साळवे, पंकज नंदन, संदीप गायकवाड उपस्थित होते.