शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी गर्दी

By Admin | Updated: August 25, 2016 23:56 IST2016-08-25T23:56:27+5:302016-08-25T23:56:38+5:30

सुराज्य रथ : सिन्नरला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवकांचाही समावेश

The crowd gathered to know about government schemes | शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी गर्दी

शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी गर्दी

 सिन्नर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात फिरविण्यात येणाऱ्या सुराज्य रथला माहिती घेण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष अश्विनी देशमुख यांच्या हस्ते सिन्नर फेरीचा शुभारंभ करण्यात आला.
माहिती उपसंचालक सतीश लळीत, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, आगार व्यवस्थापक बी. डी. उगले, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, पद्माकर गुजराथी, गंगाधर वरंदळ, नगरसेवक राजश्री कपोते, बापू गोजरे, मंगला झगडे, राजेश कपूर यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. बसस्थानकावर शुभारंभ केल्यानंतर नागरिक आणि विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती.
विशेषत: महाविद्यालयीन युवकांनी माहिती जाणून घेण्यात अधिक रस दाखविला.
यावेळी रमेश नागरे, सुनील डावरे, एकनाथ डावरे, सेवानिवृत्त प्रदर्शन अधिकारी रवींद्र घोगे, राजेंद्र घोगे, डॉ. दीपक श्रीमाळी, प्रवीण भडांगे, सुनील दातरंगे, संजय गंगावणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The crowd gathered to know about government schemes