शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

राज्यात ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे :छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 7:40 PM

नाशिक महसूल विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून, नऊ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले, तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यात नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी तीन दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे कारवाईत ८७ रेशन दुकानांचे निलंबन४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी  राहता कामा नये, यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर जोखमीची जबाबदारी आहे. या काळात नागरिकांना अन्नधान्य वाटपाची जबाबदारी स्वस्तधान्य दुकानदारांवर असून, रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे, तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. यापुढेही स्वस्तधान्य दुकानांमध्ये काळाबाजार, वाटप करताना कमी धान्य देणे किवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. राज्यातील या वितरण व्यवस्थेवर अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात आले असून, निर्माण करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे. राज्याच्या नागपूर विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून, १८ रेशन दुकानांचे निलंबन, तर एक दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अमरावती विभागात पाच गुन्हे नोंदविण्यात आले असून, सात रेशन दुकानांचे निलंबन आणि १३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. औरंगाबाद विभागात २९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून, ४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नाशिक महसूल विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून, नऊ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले, तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यात नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी तीन दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ७, तर नाशिक जिल्ह्यात ४ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. अहमदनगर व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी सात रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, तर पुणे विभागात एकूण ४ गुन्हे नोंदविण्यात आले असून, १७ रेशन दुकानांचे निलंबन व १४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कोकण विभागात एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात आले असून, सात रेशन दुकानांचे निलंबन व एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ