Crime News: भोंदूबाबाचा महिलेसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार, पोलिसांनी वकिलासह दोघांना घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 13:18 IST2022-02-24T13:14:39+5:302022-02-24T13:18:20+5:30
Crime News: भोंदूबाबाचा आईसह 3 मुलींवर बलात्कार, पोलिसांनी वकिलासह दोघांना घेतलं ताब्यात

Crime News: भोंदूबाबाचा महिलेसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार, पोलिसांनी वकिलासह दोघांना घेतलं ताब्यात
येवला (नाशिक) - मुलीला जादूटोणा झाल्याचं सांगत सलग दोन वर्षांपेक्षा अधिक काळ भोंदूबाबा व त्याच्या भावाने पीडित आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येवला शहरात ही घटना घडली असून या संदर्भात दोन जणांवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळल्याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच लग्न जमत नसल्याने येवला तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे गेली होती. त्यावेळी, या भोंदूबाबाने मुलीला जादूटोणा झाल्याचे सांगत सांगत आईसह तिन्ही मुलींना पिण्याच्या पाण्यातून गुंगीच औषध दिले. त्यानंतर, चाकूचा धाक दाखवत फिर्यादी मुलीवर बलात्कार करुन त्याचा व्हिडीओही काढला होता. या व्हिडिओची धमकी दाखवत पीडित महिलेच्या आणखी दोन मुलींवर बलात्कार केला. भोंदूबाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांनी तब्बल दोन वर्षे 4 महिने वेळोवेळी आई व त्याच्या तिन्ही मुलींवर बलात्कार करून ब्लॅकमेल केले. आतापर्यंत पीडित महिलेकडून 8 लाख रुपये उकळल्याचेही फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, एका मुलीस हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करून मुस्लिम बनण्यास प्रवृत्त केले म्हणूनही येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भोंदूबाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांना अटक झाली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.