संतापजनक! लग्नाचे आमिष दाखवून 10 वर्षे अत्याचार; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 11:05 IST2022-01-23T11:04:40+5:302022-01-23T11:05:57+5:30
एका तीस वर्षीय पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गणेश राजाराम भोसले (३४, रा. मातोश्री कॉलनी, खोडेनगर) यास पोलिसांनी अटक ...

संतापजनक! लग्नाचे आमिष दाखवून 10 वर्षे अत्याचार; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी
एका तीस वर्षीय पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गणेश राजाराम भोसले (३४, रा. मातोश्री कॉलनी, खोडेनगर) यास पोलिसांनी अटक केली आहे. संशयित भोसले याने पीडितेला सप्टेंबर २०१२ ते जानेवारी २०२२ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. तसेच अश्लील चित्रफिती दाखवून कळत-नकळत मद्य पाजत शारीरिक अत्याचार केले.
पीडित युवतीची नग्नावस्थेत छायाचित्रे, व्हिडीओ काढत ते नातेवाइकांना पाठविण्याची धमकी देत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग करत बळजबरीने इगतपुरीतील रिसॉर्ट, राहत्या घरी, तपोवनातील निर्जन ठिकाण, औरंगाबाद रोडवरील विविध हॉटेलमध्ये घेऊन जात अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गणेशविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.