फसवणूक प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:37 IST2018-04-05T00:37:22+5:302018-04-05T00:37:22+5:30
बनावट सह्या करून बनावट दस्त व नोटीस या खऱ्या आहेत असे भासवून फसवणूक केल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा
नाशिकरोड : बनावट सह्या करून बनावट दस्त व नोटीस या खऱ्या आहेत असे भासवून फसवणूक केल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र कॉलनी येथील ओम बंगला येथे राहणारे रवि किसनसा क्षत्रिय यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २८ जुलै २००९ ते ५ सप्टेंबर २०१५ या काळात संशयित किरण किसनसा क्षत्रिय (रा. जगताप मळा), विजय दत्तात्रय भागवत, दत्तात्रय सहादू भागवत (रा. भागवत मळा, सिन्नरफाटा) यांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांचा मुलगा संदीप, जावई रविकुमार कृष्णदाससा चौटे (रा. सुरत) यांची फसवणूक करून नुकसान करण्याच्या उद्देशाने २८ जुलै २००९ रोजीचा नोटरी दस्त क्र. ६६७/२००९ यावर व तलाठी कार्यालयाकडून फिर्यादी, त्यांचा मुलगा यांच्या बनावट सह्या करून बनावट दस्त व नोटीस या खºया आहेत असे भासवून सदर दस्ताचा व नोटीसचा वापर करून स्वत:ला गैर पद्धतीने लाभ होण्याच्या उद्देशाने तलाठी मंडल अधिकारी देवळाली यांच्याकडून फेरफार नोंद क्रमांक ३०५९८ ही नोंद मंजूर करून घेतली. मौजे देवळाली शिवारातील गट नं. २२५/१२ अ तसेच २२५/१२ ड या दोन्ही मिळकतीवरील सातबारा उताºयावरून इतर अधिकारातील फिर्यादी, त्यांचा मुलगा व जावई या तिघांची नावे कमी करून फसवणूक केली. फिर्यादीने दिलेल्या चौकशी अर्जावरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.