शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

गोंडेगावात पार पडलं गाईचे डोहाळे जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:58 PM

ओझर : मुक्या प्राण्यांवर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करणारी अनेक कुटुंबे आहेत. परंतु त्या मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, त्यांचेसुद्धा सुखाचे क्षण हे कार्यक्रम करून साजरे करावेत ही भावना जाणून गोंडेगाव ता. निफाड येथील शेतकरी दाते व तानाजी दाते बंधूंनी त्यांच्या आईच्या सांगण्यावरून आपल्या कपिला गाईच्या डोहाळे जेवणाचा सोहळा पार पाडला.

ठळक मुद्देमहिलांनी परंपरेनुसार गाईची ओटी भरून कार्यक्रम पार पाडला.

सुदर्शन सारडाओझर : मुक्या प्राण्यांवर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करणारी अनेक कुटुंबे आहेत. परंतु त्या मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, त्यांचेसुद्धा सुखाचे क्षण हे कार्यक्रम करून साजरे करावेत ही भावना जाणून गोंडेगाव ता. निफाड येथील शेतकरी दाते व तानाजी दाते बंधूंनी त्यांच्या आईच्या सांगण्यावरून आपल्या कपिला गाईच्या डोहाळे जेवणाचा सोहळा पार पाडला.हिंदू धर्मात गाईला देव मानले जाते. गोंडेगाव येथील शेतकरी दादाभाऊ दाते यांच्याकडे कपिला नावाची एक देशी गाय आहे. तिची देखभाल दाते कुटुंबीय घरातील सदस्याप्रमाणे करत असतात. कपिला ही गाय गरोदर असून त्याचे औचित्य साधून दाते कुटुंबाने कोरोन नियमाचे पालन करत सोमवारी (दि. २१) घरगुती पध्दतीने गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पाडला.या आगळ्यावेगळ्या डोहाळे जेवणासाठी गाईला आकर्षकरीत्या सजवण्यात आले होते. तर फराळाचे सर्व साहित्य याशिवाय पुरणपोळीचे जेवण करण्यात आले होते. दाते परिवातील महिलांनी परंपरेनुसार गाईची ओटी भरून कार्यक्रम पार पाडला. या अनोख्या कार्यक्रमाचे गावात कौतुक होत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीSocialसामाजिक