शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

चुलत भावांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: September 8, 2016 00:53 IST

दोडी बुद्रूक : पोहणे शिकणे बेतले जिवावर; परिसरात शोककळा

 नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रूक येथे वाघ वस्तीजवळ असलेल्या नाल्यात पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या दोघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली असून, दोघा युवकांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.दोडी बुद्रूक शिवारात कोटमा (वाघ मळा) येथे नाला आहे. यावर्षी दोडी शिवारात चांगला पाऊस झाल्याने या नाल्याला पाणी आहे. डोंगरावरून वाहून येणारे पाणी या नाल्यातून वाहते. बुधवारी सकाळी वाघ मळ्यातील अमोल ऊर्फ दत्तात्रय भास्कर वाघ (१९) व तुषार अशोक वाघ हे दोघे युवक आपल्या वस्तीजवळच असणाऱ्या नाल्यात पोहायला शिकण्यासाठी गेले होते. पोहायला जाताना त्यांनी घरी आपण नाल्यात पोहायला शिकण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते.सुमारे एक तास झाल्यानंतर मुले घरी न आल्याने भास्कर वाघ नाल्यावर गेले. संशय आल्याने वाघ यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, उपसरपंच सुदाम वाघचौरे, प्रमोद भालेराव, रोशन भालेराव, नाना शिंदे, मनोज वैद्य यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चांगले पोहायला येणारे युवक नाल्यात उतरले. सुमारे अर्धा तास शोधमोहीम राबविल्यानंतर तुषार व अमोल यांचा मृतदेह आढळून आला. तुषार वाघ हा कल्याण येथे आयटीआयचे शिक्षण घेतो. गणपती उत्सवासाठी तो मूळ गावी दोडी येथे आला होता. तुषार व अमोल हे चुलत भाऊ असून, ते पोहायला शिकण्यासाठी नाल्यात गेले  होते. दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतदेह नाल्यातून बाहेर काढल्यानंतर दोडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, हवालदार पी.के. अढांगळे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)