शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

चुलत मामाकडून भाचीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:41 IST

उपनगर नाका गांधी शोरूमच्या वाहनतळात राहणाऱ्या आपल्या अल्पवयीन भाचीवर चुलत मामाने सुमारे तीन महिने वारंवार शारीरिक-लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : उपनगर नाका गांधी शोरूमच्या वाहनतळात राहणाऱ्या आपल्या अल्पवयीन भाचीवर चुलत मामाने सुमारे तीन महिने वारंवार शारीरिक-लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील श्रीष्टी वाहेगाव येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या उपनगर परिसरात एका सोसायटीच्या वाहनतळात वास्तव्यास असलेल्या दांपत्याच्या अल्पवयीन चिमुकली सोबत तिच्या चुलत मामाने सलग तीन महिने अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली. पीडित बालिकेचे आई-वडील मोलमजुरी व वॉचमनचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांच्या बारा वर्षांच्या मुलीच्या पोटात दोन दिवसांपूर्वी वेदना होऊन उलट्याचा त्रास झाला. त्यामुळे तिला कुटुंबीयांनी जवळच्या मनपा दवाखान्यात उपचारासाठी हलविले असता अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी केलेल्या तपासणीत पुढे आले. मुलीचा सतीश नावाचा चुलत मामा हा दोन-तीन महिन्यांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने पीडितेचे आई, वडील मोलमजुरीला गेल्याचे बघून भाची एकटीच असताना तिच्यासोबत गैरवर्तन करत तोंडात रुमाल कोंबून चाकूचा धाक दाखवून ‘तू जर ओरडली तर मारून टाकेन’ असा दम देत अतिप्रसंग केला. जर कोणाला सांगितले तर भावाला मारून टाकेन, असा दम दिला. सतीशने वारंवार रात्री मुक्कामास थांबून भाचीवर सात ते आठ वेळा अतिप्रसंग केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRapeबलात्कार