सटाण्यानजीक टँकरखाली सापडून दांपत्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 01:03 IST2019-03-21T01:02:56+5:302019-03-21T01:03:12+5:30
भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरखाली दुचाकी सापडून झालेल्या भीषण अपघातात दांपत्य जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघातातील मृत बागलाण तालुक्यातील अलियाबाद येथील रहिवाशी आहेत.

सटाण्यानजीक टँकरखाली सापडून दांपत्य ठार
सटाणा : भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरखाली दुचाकी सापडून झालेल्या भीषण अपघातात दांपत्य जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघातातील मृत बागलाण तालुक्यातील अलियाबाद येथील रहिवाशी आहेत. हा अपघात बुधवारी (दि. २०) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सटाणा - ताहाराबाद रस्त्यावरील डांग्या मारु ती नजीक घडला.
तालुक्यातील अलियाबाद येथील संतोष बापू बागुल (२४), सपना संतोष बागुल (२०) यांचा गेल्या वर्षी विवाह झाला. ते दोघे विवाहानंतर नोकरीनिमित्त नाशिक येथे वास्तव्यास होते. होळीनिमित्त दुचाकीने नाशिक येथून गावी येत असताना सटाणानजीकच्या डांग्या मारु ती नजीक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकर खाली सापडून झालेल्या अपघातात हे दोघे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी टँकर-चालकाला अटक केली आहे.