शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

‘स्वागत हाइट’चा पाणीपुरवठा  तोडल्याने नगरसेवकांचा गोेंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 1:15 AM

सातपूर विभागातील कामगारनगरजवळ असलेल्या स्वागत हाइट या इमारतीची उंची अवघी सहा इंच वाढल्याने महापालिकेने दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित केला असून, तो पूर्ववत करावा, या मागणीसाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला.

नाशिक : सातपूर विभागातील कामगारनगरजवळ असलेल्या स्वागत हाइट या इमारतीची उंची अवघी सहा इंच वाढल्याने महापालिकेने दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित केला असून, तो पूर्ववत करावा, या मागणीसाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. एक तर पाणी द्या नाही तर संबंधित इमारतीला परवानगी देणाऱ्या अधिकाºयांवर कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी करणाºया नगरसेवकांनी सोमवारी सभागृहात रौद्रावतार धारण केला.दरम्यान, या प्रकरणात तीन अभियंत्यांनी क्रमवारीनुसार सदरच्या इमारतीला परवानगी दिली. त्याबाबत नगररचना विभागाच्या सहायक संचालकांना अहवाल देण्यास आपण महासभेतच सांगितले होते. मात्र तो न मिळाल्याने सहायक संचालक सुरेश निकुंभे यांच्यासह अन्य अभियंत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.शहरातील २ लाख ६९ हजार बेकायदेशीर मिळकतींचा विषय सुरू असतानाच प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक संतोष गायकवाड यांनी या विषयावरून आक्रमक भूमिका घेतली. केवळ सहा इंच बांधकाम जास्त असल्याचे निमित्त करून अशाप्रकारची कार्यवाही करण्यात आली. या इमारतीचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र वीजपुरवठा सुरू झाला परंतु दोन महिन्यांपासून पाणी नाही, असे सांगितले. विलास शिंदे यांनी प्रशासनाला काही माणुसकी आहे की नाही असा प्रश्न करीत एकीकडे अधिकाºयांनी या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला दिला आणि आता तीच बेकायदेशीर ठरवून पाणीपुरवठा खंडित केल्याचे सांगितले. अजय बोरस्ते आणि सत्यभामा गाडेकर यांनी अधिक आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले आणि पाणी द्या नाही तर सदरच्या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला द्या, असे सांगत विरोधक उभे राहिले. भाजपाला त्यांनी आव्हान दिल्यानंतर भाजपा नगरसेवकांनीदेखील जाब विचारला तर सलीम शेख यांनी सदरच्या इमारतीला महापालिकेने दररोज टॅँकरने पाणीपुरवठा करता येईल, असे सांगून १८०० रुपये रोज या दराने पाणी दिले जात असल्याचे सांगितले.अग्निशमन दलाचे यापूर्वीच्या वादग्रस्त अधिकाºयांचे कारनामे भयंकर असून, डॉक्टरांना त्रास देणाºया अधिकाºयांच्या आधारे कारवाई कशासाठी असा प्रश्न करण्यात आला. यावेळी नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी खाडे, राजू आहेर आणि कार्यकारी अभियंता संजय घुगे यांनी परवानगी दिल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.शहरात अनेक बेकायदेशीर इमारती असताना याच इमारतीवर कारवाई का करण्यात आली, असा प्रश्न करीत नगरसेवकांनी आयुक्तांना जाब विचारला. महापौर रंजना भानसी आणि अन्य नगरसेवकांनी सदरच्या इमारतीला पाणीपुरवठ्याची मागणी करतानाच चूक दुरुस्तीची मागणी केली. तसेच या इमारतीच्या रहिवाशांना एकवेळ संधी देण्याची मागणी केली. तर आयुक्तांनी सहा इंच बांधकाम कमी केल्याशिवाय पाणी देता येणार नाही, असे सांगितले. दिनकर पाटील यांनी आता गटनेते जाऊनच सदरच्या इमारतीचे वाढीव बांधकाम पाडतील मग तर पाणीपुरवठा करता येईल ना, असा प्रश्न केला.सदर इमारतीच्या कारवाईमागे अनेक घडामोडी आहेत. रहिवांशामध्येच दोन गट आहेत. एका गटाकडून तक्रार करून पाठपुरावा केला जातो. दुसरीकडे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशावेळी तोडगा काढण्यासाठी संबंधित रहिवाशांना आपण वाढीव बांधकाम करण्याचा एकदा नव्हे तर अनेकदा सल्ला दिला होता, परंतु त्यांनी तो अमलात आणला नाही त्याला काय करणार? अशा इमारतीतून रहिवाशांना पोलिसांमार्फत निष्कासीत करून इमारत खाली करून घेणे हा एक पर्याय आहे. न्यायालयीन क्लिष्टता बघता पाणीपुरवठा करता येणार नाही, मात्र दुर्लक्ष करणाºया मनपा अधिकाºयांवर कारवाई केली जाईल.  - तुकाराम मुंढे, आयुक्त, मनपा

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढेNashikनाशिक