शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक आक्रमक

By admin | Updated: January 20, 2016 23:29 IST

सिडको प्रभाग सभा : भाजीबाजाराच्या अतिक्रमणाबाबतही नाराजी

सिडको : सिडको भागातील काही घरांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसताना दुसरीकडे मात्र त्याच भागात घरांच्या समोर राहणाऱ्या नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सर्व नागरिकांना पुरेसा व समान पाणीपुरवठा करावा, तसेच येथील चौकाचौकात आणि मुख्य रस्त्यालगत भरणाऱ्या अनधिकृत भाजीबाजाराविषयी वारंवार सांगूनही कारवाई केली जात नसल्याने यात अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.सिडको प्रभाग सभा सभापती कांचन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी लाखो रुपयांच्या कामांना एका मिनिटात परवानगी देण्यात आली. यावेळी नगरसेवक कल्पना पांडे यांनी सांगितले की, प्रभागातील अंतर्गत रस्त्यांमध्ये घंटागाडी पोहचत नसून यासाठी गल्लीबोळात जाऊ शकेल, अशी मिनी घंटागाडी अनेकदा सांगूनही सुरू केली नाही. तसेच शिवाजी चौक येथील भाजीबाजाराचे अतिक्रमण हटविण्यात यावे, असे सांगितले. नगरसेवक हर्षा बडगुजर म्हणाल्या की, प्रभागातील नागेश्वर चौकात लाखो रुपये खर्च करून नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, तसेच इतर सुविधा नुकत्याच पुरण्यात आल्या आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील मैदानाला ठिकठिकाणी खड्डे पाडून अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धांना कोणी परवानगी दिली. यामुळे लाखो रुपयांच्या कामाचा चुराडा होत असून याची नुकसानभरपाई कोण करणार, असे सांगून हर्षा बडगुजर यांनी मनपाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. नगरसेवक शोभा फडोळ यांनीही, प्रभागात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पाण्याच्या टाक्या स्वच्छ होत नसल्याचे सांगितले. तर नगरसेवक उत्तम दोंदे यांनीदेखील प्रभागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसून लाखो लिटर पाणी जाते कुठे? असा सवाल करीत हे अधिकारी पाण्याबरोबरच पाण्याचा टॅँकरही विकतात का, असा आरोपही दोंदे यांनी केला. तर एकाच ठिकाणच्या परिसरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात तफावत आहे. काही नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही तर काहींना मात्र धो धो पाणीपुरवठा होत असून, याबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे नगरसेवक रत्नमाला राणे यांनी सांगितले.नगरसेवक वंदना बिरारी यांनी प्रभागातील घंटागाडीची दयनीय अवस्था झाल्याचे सांगितले. तसेच रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित बुजविण्यात येत नसल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी नगरसेवक शीतल भामरे यांनीही प्रभागातील मोरवाडी, अश्विननगर, मोरवाडी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. नगरसेवक शोभा निकम यांनी प्रभागात पथदीप बंद असल्याचे सांगितले. (वार्ताहर)