दिव्यांग निधी खर्चाबाबत मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:02+5:302021-02-05T05:43:02+5:30

राज्य व केंद्र शासनाच्या आदेशानुसार व शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्था यांना त्यांचे एकूण उत्पन्नातून ५ टक्के हा निधी ...

Corporation's disregard for disability fund expenditure | दिव्यांग निधी खर्चाबाबत मनपाचे दुर्लक्ष

दिव्यांग निधी खर्चाबाबत मनपाचे दुर्लक्ष

राज्य व केंद्र शासनाच्या आदेशानुसार व शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्था यांना त्यांचे एकूण उत्पन्नातून ५ टक्के हा निधी दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे व राखीव दिव्यांग निधी दिव्यांग कल्याणार्थ खर्च करणे आवश्यक असताना नाशिक महानगरपालिका निधी अतिशय संथगतीने खर्च करत असल्याने दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहत आहेत, तो निधी तत्काळ खर्च करण्यात यावा, तसेच दिव्यांग नोंदणी पुन्हा करण्यात यावी यासाठी ‘ क’ महानगरपालिका समाज कल्याण उपायुक्त अर्चना तांबे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दिघे, कार्याध्यक्ष बबलू मिर्झा. शहराध्यक्ष ललित पवार, उपशहराध्यक्ष रूपेश परदेशी, सरचिटणीस बच्चू निकाळजे उपस्थित होते. (३१समाजकल्याण)

Web Title: Corporation's disregard for disability fund expenditure