शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात कोरोनाचा चौथा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:21 IST

नाशिक : शहरात बाहेरून येणाऱ्यांमुळे कोरोनाचा धोका वाढला असताना शहरातून बाहेर जाऊन पुन्हा शहरात येणाऱ्यांमुळेदेखील धोका वाढला आहे. सातपूर-अंबड लिंकरोडवरील एक ज्येष्ठ नागरिक नवी मुंबईला सहकुटुंब जाऊन आल्याने त्याचा स्वत:चा मृत्यू झाला. त्याचबरोबर समतानगर येथील एका इसमाचीही शनिवारी मृत्यूची घटना घडल्याने शहरात कोरोनाने आजवर चार बळी घेतले आहेत. दरम्यान, सायंकाळपर्यंत आलेल्या अहवालानुसार शहर परिसरात कोरोनाबाधितांची संख्या ७४ इतकी झाली आहे.

नाशिक : शहरात बाहेरून येणाऱ्यांमुळे कोरोनाचा धोका वाढला असताना शहरातून बाहेर जाऊन पुन्हा शहरात येणाऱ्यांमुळेदेखील धोका वाढला आहे. सातपूर-अंबड लिंकरोडवरील एक ज्येष्ठ नागरिक नवी मुंबईला सहकुटुंब जाऊन आल्याने त्याचा स्वत:चा मृत्यू झाला. त्याचबरोबर समतानगर येथील एका इसमाचीही शनिवारी मृत्यूची घटना घडल्याने शहरात कोरोनाने आजवर चार बळी घेतले आहेत. दरम्यान, सायंकाळपर्यंत आलेल्या अहवालानुसार शहर परिसरात कोरोनाबाधितांची संख्या ७४ इतकी झाली आहे.दरम्यान, शहरात शनिवारी (दि.२३) आणखी सात रुग्ण आढळले त्यात एक कॉलेजरोड आणि एक महाराणाप्रताप चौकातील तर नाईकवाडीपुरा येथील चार व एक रुग्ण शिवाजीवाडी येथील आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ७४ झाली आहे.मुंबई-पुणे आणि मालेगावबरोबरच धुळे आणि जळगावमधून नाशिक शहरात येणाºयांमुळे बाधितांची संख्या वाढत असल्याचा महापालिकेचा आक्षेप आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांना पत्र देऊन सीमा सील करण्याच्या सूचना महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे दिल्या होत्या. परंतु आता त्याच्या पुढे जाऊन नाशिक शहरातील अनेक जण बाहेरगावी जाऊन आल्याने संसर्गचा धोका वाढत असल्याचेदेखील प्रकार घडत आहे.काही दिवसांपूर्वी सातपूर येथील महिला आणि तिचे कुटुंबीय मालेगाव येथे अंत्यसंस्कारासाठी गेले होते. त्यानंतर त्या वृद्धेला आणि तिच्या संपर्कातील तब्बल दहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने उपचाराअंति हे सर्व बरे झाले. परंतु आता मात्र, संजीवनगर येथे असाच प्रकार घडला आहे. येथील एक कुटुंब नवी मुंबई येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. तेथून परल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला १९ मे रोजी त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यावेळी त्याचा घसा स्त्रोत नमुना तपासल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला. परंतु त्या वृद्धाचा त्याच दिवशी मृत्यू झाला तर समतानगर येथील ५४ वर्षीय पुरुष हा आंबोली येथे आरोग्यसेवक म्हणून काम करीत होता. त्यालाही त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्याचे शनिवारी निधन झाले. या वृद्धाच्या संपर्कातील दोन जणांनादेखील लागण झाल्याचा पहिला अहवाल आला. त्यानंतर महापालिकेने त्या वृद्धाच्या संपर्कातील ५३ जणांचे नमुने पाठविले होते. शुक्रवारी (दि.२२) त्यातील ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एक महिला लेखानगर येथील आहे, तर एकजण पंचवटीतील असल्याचे आढळले. आणखी काही अहवालांची प्रतीक्षा असून, त्यामुळे महापालिका चिंतित आहे.दरम्यान, शनिवारी (दि.२३) आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एक जण कॉलेजरोडवर राहण्यास असला तरी मालेगाव येथे कर्तव्य बजावणारा पोलीस अधिकारी आहे तर एक जण राणा प्रताप चौकातील बाधित रुग्ण नवा आहे. त्यानेदेखील बाहेरगावी प्रवास केल्याची हिस्ट्री आहे.

टॅग्स :Nashikनाशिक