कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, इगतपुरी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील आशा सेविका, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, डाॅक्टर आदींनी जनजागृती करत मेहनत घेतल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील वाडिवऱ्हे परिसरातील अविरत सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने किरण कातोरे यांच्या संकल्पनेतून ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
वेळी आयोजित आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने हाडांची तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, ऑक्सिजन तपासणी, मधुमेह तपासणी, दातांची तपासणी, गुडघेदुखी आदीं विविध आजारांवर उपचार करण्यात आले असून उपस्थित तज्ज्ञांमार्फत सल्ला देण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे राजू नाठे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. संदीप गुळवे, तुकाराम वारघडे, मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, किरण कातोरे, डाॅ. माळी, डाॅ. योगेश मते, डॉ. उल्हास बोडके, सरपंच रोहीदास कातोरे, प्रवीण मालुंजकर, सुदाम भोर, पंडित कातोरे, आरोग्यदूत निवृत्ती गुंड, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
(१४ वाडिवऱ्हे)
वाडिवऱ्हे येथे आयोजित आरोग्य शिबिरात सत्कार प्रसंगी निवृत्ती जाधव, रामदास धांडे, तुकाराम वारघडे, किरण कातोरे, राजू नाठे व इतर पदाधिकारी.
140821\14nsk_42_14082021_13.jpg
वाडिवऱ्हे येथे आयोजित आरोग्य शिबिरात सत्कार प्रसंगी निवृत्ती जाधव, रामदास धांडे, तुकाराम वारघडे, किरण कातोरे, राजू नाठे व इतर पदाधिकारी.