Corona Vaccine : लस घेऊन काही झाल्यास मुलांकडे कोण बघेल?; कर्मचाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांना द्यावं लागतंय तोंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 10:28 IST2021-12-20T10:16:59+5:302021-12-20T10:28:36+5:30

नाशिक : ‘ओमायक्रॉन’चे संकट वाढत असताना अद्याप एकही लस न घेतलेल्या नागरिकांची संख्या जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक आहे. आता ...

corona vaccination Employees have to face people's questions in nashik | Corona Vaccine : लस घेऊन काही झाल्यास मुलांकडे कोण बघेल?; कर्मचाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांना द्यावं लागतंय तोंड

Corona Vaccine : लस घेऊन काही झाल्यास मुलांकडे कोण बघेल?; कर्मचाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांना द्यावं लागतंय तोंड

नाशिक : ‘ओमायक्रॉन’चे संकट वाढत असताना अद्याप एकही लस न घेतलेल्या नागरिकांची संख्या जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक आहे. आता तर शासनाने कोणत्याही वेळी, तसेच घरपोच लस उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवूनही अनेक नागरिक लस नाकारतात. त्यातील काही नागरिकांची कारणे आणि प्रश्न आरोग्य अधिकाऱ्यांनाही निरुत्तर करून टाकणारे असतात. लस घेतल्यानंतर मला काही झाल्यास मुलांकडे कोण बघेल, लस ऐच्छिक आहे, तर घेण्याचा आग्रह का, यासह विविध प्रश्नांना आरोग्य कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मला रक्ताचा आजार आहे, माझ्या ब्रेनवर उपचार सुरू आहेत, मी अजूनपर्यंत एकही इंजेक्शन घेतलेले नाही, इंजेक्शन घेतल्यास मला चक्कर येते, आमचे एक नातेवाईक इंजेक्शन घेतल्यानंतर वारले, मी इंजेक्शन घेऊन काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, माझ्या मुला-बाळांची जबाबदारी तुम्ही घेणार का, मला मुले झाली नाहीत तर माझे म्हातारणपण कोण काढणार, यासह अनेक प्रकारच्या चमत्कारिक कारणांचा सामना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.

तालुकानिहाय पहिला डोस न घेतलेले रुग्ण

बागलाण ९९०४४ , देवळा ३१५३७, दिंडोरी ४७१६५ , इगतपुरी ५३१०४ , कळवण ५२८१४ , नाशिक ३२६८३ , पेठ २७८८०, सुरगाणा ६४५१२ , त्र्यंबक ३५३१० , चांदवड ४७२०० , मालेगाव ८४७१७, नांदगाव ८७९५७ , निफाड १०५३३१, सिन्नर ८१६३२ , येवला ६४९१२, नाशिक मनपा ३६९३९३ , मालेगाव मनपा ३७८३३०

ही काय कारणे झाली?

* कोरोनाची लस घेण्यासाठी प्रामुख्याने आदिवासी भागातील जनतेत मोठी उदासीनता आहे. त्यांच्या मते कोरोना हा आजारच अस्तित्वात नाही.

* असाच समज मुस्लीम समाजाच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कोरोना वैगेरे असे काही आजार आपल्याला होत नाही, हे काही तरी षडयंत्र असल्याचा गैरसमज त्यांच्यात आहे.

* लस घेतल्याने थंडी, ताप येतो अशा वेळी कामधंदा, रोजगार बुडण्याची भीतीही ग्रामीण भागात अनेकांना भेडसावत आहे.

कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येक नागरिकाने घ्यावी, यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या या संबंधतील समज-गैरसमज व अडचणी लक्षात घेऊन त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. थेट नागरिकांच्या घरांपर्यंत लस देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

- डॉ. कैलास भोये, लसीकरण समन्वयक

Web Title: corona vaccination Employees have to face people's questions in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.