शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

कोरोना उपचाराचं भरमसाठ बिल, नाशिकमध्ये रुग्णालयाबाहेर अंगावरील कपडे काढून अनोखं आंदोलन; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 20:39 IST

नाशिकमधील एका रुग्णालयात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांनासोबत घेत रुग्णालयामध्ये 'कपडे काढो' आंदोलन करत ठिय्या दिला.

- अझहर शेख 

कोरोना संकटात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याचे प्रकार अजूनही काही थांबताना दिसत नाहीत. खासगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णावर उपचारासाठी अव्वाच्या सव्वा दराने रक्कम आकारली जात असल्याने नाशिकमधील एका रुग्णालयात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांनासोबत घेत रुग्णालयामध्ये 'कपडे काढो' आंदोलन करत ठिय्या दिला. या गांधीगिरीचे फेसबुक लाईव्ह करण्यात आल्याने नाशिककरांमध्ये खासगी रुग्णालयांच्या अमानवी वागणुकीविषयी तीव्र संतापाची लाट पसरली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी भावे यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले असता मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. पोलिसांनी भावे यांना गेल्या तीन तासांपासून पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं असून त्यांच्यावर अद्याप कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. पण व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानं पोलीस ठाण्याबाहेर खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात संतप्त नागरिकांनी गर्दी केली आहे. नेमकं काय घडलं?नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात एका कुटुंबातील पाच सदस्यांवर कोरोनावरील उपचार सुरू होते. यातील चार सदस्य उपचारादरम्यान दगावले आहेत. तर एक सदस्य कोरोनावर मात करुन घरी परतला. रुग्णालयानं आकारलेलं जवळपास साडेचार लाखांचं बिल देखील कुटुंबातील सदस्यानं रुग्णालयाला अदा केलं होतं. पण रुग्णालयानं रुग्ण दाखल होताना डिपॉझिट म्हणून घेतलेले दीड लाख रुपये परत दिलेले नाहीत. संबंधित कुटुंबातील सदस्य गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात खेटा घालत होते. तरीही रुग्णालय प्रशासनानं डिपॉझिट परत दिलेलं नाही. याच मुद्द्यावरुन आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णालायत धडक देऊन आंदोलन केलं. 

नाशिकमध्ये आम आदमी पक्षाकडून कोरोना काळात खासगी रुग्णालयांकडून केल्या जाणाऱ्या मनमानी कारभाराची पोलखोल करण्यासाठी 'ऑपरेशन हॉस्पीटल चळवळ' नावाची मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आम आदमी पक्षाकडून खासगी रुग्णालयांचे मनमानी कारभार फेसबुक लाइव्हद्वारे उघडकीस आणले जातात. याच मोहिमेत आज जितेंद्र भावे यांनी रुग्णालय डिपॉझिटचे पैसे रुग्णाला परत करत नसल्यामुळे 'आमचे कपडे घ्या, पण पैसे परत करा' अशी भूमिका घेत अनोखं आंदोलन केलं.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAAPआप