कोरोनामुक्त ७८; बाधित १०७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 01:22 IST2021-09-23T01:21:15+5:302021-09-23T01:22:18+5:30
जिल्ह्यात बुधवारी (दि. २२) एकूण ७८ नागरिक कोरोनामुक्त झाले असून १०७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक शहर आणि ग्रामीणला प्रत्येकी एक असा दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८६१७ वर पोहोचली आहे.

कोरोनामुक्त ७८; बाधित १०७
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. २२) एकूण ७८ नागरिक कोरोनामुक्त झाले असून १०७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक शहर आणि ग्रामीणला प्रत्येकी एक असा दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८६१७ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील एकूण उपचारार्थी संख्या ९८८ झाली असून त्यात सर्वाधिक ६८६ उपचारार्थी नाशिक ग्रामीणचे, २७६ नाशिक शहराचे, मालेगाव मनपाचे १६ तर जिल्हाबाह्य १० उपचारार्थींचा त्यात समावेश आहे. तर प्रलंबित अहवालांची संख्या ८०२ वर पोहोचली आहे. त्यात ४७७ नाशिक ग्रामीणचे, नाशिक मनपाचे १९१, मालेगाव मनपाचे १३४ अहवालांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांचे सरासरी प्रमाण ९७.६४ टक्क्यांवर कायम आहे.