मनसेत शाखाध्यक्ष नेमण्यासाठी कोअर कमिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST2021-08-18T04:19:33+5:302021-08-18T04:19:33+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शाखा अध्यक्षपद महत्त्वाचे राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या ...

Core committee to appoint MNS branch president | मनसेत शाखाध्यक्ष नेमण्यासाठी कोअर कमिटी

मनसेत शाखाध्यक्ष नेमण्यासाठी कोअर कमिटी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शाखा अध्यक्षपद महत्त्वाचे राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सहा विभागात नूतन शाखाध्यक्ष नेमणुकीसाठी विभाग अध्यक्ष नेतृत्वाखाली विभागवार कोर कमिटी रचना करत कमिटीची पहिली बैठक राजगड कार्यालयात झाली. याप्रसंगी शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला सत्यम खंडाळे, संतोष पिल्ले, विक्रम कदम, नितीन साळवे, रामदास दातीर, योगेश लभडे, पराग शिंत्रे, राकेश परदेशी, संतोष कोरडे, विजय अहिरे, अक्षय खांडरे, गणेश मोरे, कौशल पाटील, ललित वाघ, हरीश गुप्ता, निकितेश धाकराव, अभिजित गोसावी, विजय ठाकरे, निखिल सरपोतदार, विजय आगळे, अंबादास आहिरे, नितीन पंडित, रवी कडजेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Core committee to appoint MNS branch president