तकिया मशीद कमिटीकडून मराठी कुराणाची प्रत भेट

By Admin | Updated: July 30, 2014 00:18 IST2014-07-29T22:49:44+5:302014-07-30T00:18:15+5:30

तकिया मशीद कमिटीकडून मराठी कुराणाची प्रत भेट

Copy of the Marathi Quran from the pillow mosque committee | तकिया मशीद कमिटीकडून मराठी कुराणाची प्रत भेट

तकिया मशीद कमिटीकडून मराठी कुराणाची प्रत भेट

भालूर : ईदनिमित्त जातीय सलोख्याचे दर्शनमनमाड : भालूर येथे रमजान ईदचे औचित्य साधून तकिया मशीद कमिटीच्या वतीने हिंंदू बांधवांना पवित्र धर्मग्रंथ कुराणाची मराठी प्रत भेट हिंदू - मुस्लीम ऐक्याचे अनोखे दर्शन घडविले.
मशिदीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शीरखुर्म्याच्या कार्यक्रमास हिंदू - मुस्लीम बांधवांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
भालूर येथे एकमेव मशीद असून, दरवर्षी येथे मुस्लीमबांधवांचे सण एकत्रित साजरे केले जातात. रमजान ईदनिमित्त आज मौलाना हाफीज मंहमद नूर यांच्या मार्गदर्शनाखाली तकीया मशिदीमधे सामूहिक नमाजपठण करण्यात आले.
यावेळी गावात सुख - शांती नांदावी व दुष्काळ दूर व्हावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. गावातील हिंंदूबांधवांनी मुस्लीमबांधवांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मशीद कमिटीच्या वतीने शब्बीर शेख यांच्या हस्ते हिंदूबांधवांसाठी गावाचे पुरोहित विनायक कुलकर्णी यांच्याकडे पवित्र धर्मग्रंथ कुराणची मराठी प्रत भेट देण्यात आली.
मशिदीमध्ये शीरखुर्म्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच वामन पवार, माजी सरपंच विठ्ठलराव अहेर, शिवसेनेचे शिवाजीराव ढगे, दिनकर पाटील, नंदू अहेर, चांगदेव उगले, परसराम शिंदे, मनमाड पोलीस ठाण्याचे बीट कर्मचारी दगू बारहाते, शब्बीर शेख, अकबर शहा, हुसेन शेख, अनिस शेख, गफुर शहा,नुराभाई शहा, अज्जू शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Copy of the Marathi Quran from the pillow mosque committee