शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

नाशिकमध्ये कॉँग्रेसच्या गटनेतापदाचा वाद सुटता सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 19:05 IST

नाशिक-  महापालिकेत कॉँग्रेस पक्षाच्या गटनेता म्हणून नियुक्त होऊनही अंतर्गत वादामुळे डॉ. हेमलता पाटील यांची गटनेता पदी नियुक्ती झालेली नाही. सध्याचे गटनेता शाहु खैरे यांनी पद सोडण्यास विरोध केल्याचे प्रमुख कारण असल्याने हा वाद शिलगतच आहे. आता पक्ष श्रेष्ठी बदलले असून ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींचा कोणताही निर्णय आपल्याला मान्य असेल असे डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देपाटील- खैरे यांच्यात वादहेमलता पाटील यांची झाली नियुक्तीशाहु खैरे यांनी पद सोडण्यास दिला नकारआता निर्णय श्रेष्ठींवर अवलंबून

नाशिक महापालिकेत कॉँग्रेस पक्षाच्या गटनेता म्हणून नियुक्त होऊनही अंतर्गत वादामुळे डॉ. हेमलता पाटील यांची गटनेता पदी नियुक्ती झालेली नाही. सध्याचे गटनेता शाहु खैरे यांनी पद सोडण्यास विरोध केल्याचे प्रमुख कारण असल्याने हा वाद शिलगतच आहे. आता पक्ष श्रेष्ठी बदलले असून ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींचा कोणताही निर्णय आपल्याला मान्य असेल असे डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितले.

विशेष म्हणजे कॉँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या समक्ष शाहु खैरे यांनी राजीनामा देण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात राजीनामा दिला नसल्याचा आरोप करीत डॉ. पाटील यांनी महापौर रंजना भानसी देखील कॉँग्रेस पक्षात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप केला.

कॉँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सध्या शाहु खैरे आहेत काही महिन्यांपूर्वी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्याचे पत्र पक्षाने दिले होते. मात्र महापौरांनी ते दोन महासभा दडपून ठेवले असा पाटील यांचा आरोप आहे. ज्या महासभेत महापौरांनी गटनेतापदाची औपचारीक घोषणा करण्याची तयारी दर्शविली. त्या सभेत शाहु खैरे यांनी आक्षेपाचे पत्र दिले. पक्षाच्या नगरसेवकांची बैठक बोलवून गटनेता निवडला जातो परंतु अशी प्रक्रीया राबविली गेली नसल्याचे खैरे यांचे म्हणणे होते. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी डॉ पाटील यांच्या नावाची घोषणा केलीच नाही. गुरूवारी (दि.२५) डॉ. हेमलता पाटील यांनी यासर्व घटनांना उजाळा दिला. तसेच आपल्याला गटनेता म्हणून घोषीत करण्यास टाळटाळ करणाऱ्या महापौर त्यांच्या पक्षाच्या गटनेत्यांची महासभेत घोषणा होण्या आधीच सर्व नियम पायदळी तुडवून कसे काय सुविधा देऊ शकतात असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण