शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेच्या कृषी मंत्रालयाबरोबर नाशिकच्या एम अ‍ॅण्ड एम इंडस्ट्रिजचा करार

By admin | Updated: September 10, 2016 00:57 IST

श्रीलंकेच्या कृषी मंत्रालयाबरोबर नाशिकच्या एम अ‍ॅण्ड एम इंडस्ट्रिजचा करार

नाशिक : दिंडोरी, तळेगाव येथील एम अ‍ॅण्ड एम इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या सेंद्रीय शेती उत्पादनांद्वारे श्रीलंका येथे १९९९ सालापासून सेंद्रीय शेती क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने तसेच श्रीलंकेतील सेंद्रीय शेतीला नवी चालना मिळावी यासाठी श्रीलंका सरकारच्या कृषी मंत्रालयाबरोबर सेंद्रीय शेती विकास प्रशिक्षण आणि सेंद्रीय उत्पादने वितरणाचा महत्त्वपूर्ण करार शुक्रवारी (दि. ९) करण्यात आला. त्र्यंबकरोड येथील हॉटेल एमराल्ड पार्क येथे हा करार करण्यासाठी श्रीलंका येथील अन्न विकास मंडळाचे अध्यक्ष प्रभात पेईरिस आणि संचालक गोवीगाडा प्रियांकरा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. एम अ‍ॅण्ड एम या कंपनीतर्फे श्रीलंकेसह जगभरातील १६ देशांना सेंद्रीय उत्पादनाची निर्यात करण्यात येते. केवळ निर्यात न करता त्या-त्या देशातील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्त्व विशद करणे, त्याचा वापर, विक्री व्यवस्था, नियोजन याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या करारानंतर श्रीलंका सरकार तेथील शेतकऱ्यांना अल्प दरात सेंद्रीय शेती उत्पादने कृषी सहाय्य केंद्रातून उपलब्ध करून देणार आहे. एम अ‍ॅण्ड एम कंपनीची उत्पादने जागतिक सेंद्रीय प्रमाणकानुसार दिंडोरी येथील कारखान्यात तयार होतात. श्रीलंका सरकारने भारतीय सेंद्रीय शेतीची चळवळ लक्षात घेऊन तसेच भारतीय उत्पादनावर विश्वास ठेवून नाशिकमधील कंपनीला संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. श्रीलंका कृषी मंत्रालयाबरोबरचा हा करार म्हणजेच सेंद्रीय शेती विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या करारामुळे प्रशिक्षण आणि सेंदी्रय शेतीला आवश्यक अशा उत्पादनामुळे श्रीलंकेत सेंद्रीय चळवळ वाढण्यास मदत होणार आहे. यावेळी एम अ‍ॅण्ड एम कंपनीचे संचालक मनोहर शेटे यांनी श्रीलंकेचे अन्न विकास मंडळ आणि श्रीलंकेचे कृषिमंत्री डूमिंडा दिशानायके यांचे आभार मानले. यावेळी श्रीलंका कृषी मंत्रालयाचे प्रतिनिधी अन्न विकास महामंडळाचे अध्यक्ष दमिका पेरिस, उपाध्यक्ष रवि जयवर्षना, एम अ‍ॅण्ड एम इंडस्ट्रिजचे संचालक मनोहर शेटे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)