देवळ्यात कॉँग्रेसची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 01:47 AM2020-08-31T01:47:09+5:302020-08-31T01:48:06+5:30

पक्ष मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी गावागावांत काँग्रेसच्या शाखा सुरू करून कार्यकर्त्यांची संख्या वाढवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी केले. देवळा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

Congress review meeting at the temple | देवळ्यात कॉँग्रेसची आढावा बैठक

देवळा येथे आयोजित आढावा बैठकीत संवाद साधताना काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन. समवेत शिरीषकुमार कोतवाल, डॉ. तुषार शेवाळे आदी.

Next

देवळा : पक्ष मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी गावागावांत काँग्रेसच्या शाखा सुरू करून कार्यकर्त्यांची संख्या वाढवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी केले. देवळा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीने देवळा तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात काँग्रेस, युवक काँग्रेस व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेळके, नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर आदी उपस्थित होते. स्वतंत्र एमआयडीसीची स्थापना करून तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवावा, चणकापूर धरणातील उजव्या कालव्याची वहन वाढवावी आदी विषयावर चर्चा करून देवळा तालुका काँग्रेसच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. स्वप्निल सावंत यांनी आभार मानले.

Web Title: Congress review meeting at the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.