शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
5
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
6
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
7
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
8
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
9
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
10
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
11
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
12
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
13
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
14
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
15
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
16
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
17
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
18
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
20
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस, राष्ट्रवादीची ‘एकला चलो’ची भूमिका

By admin | Updated: January 12, 2017 00:59 IST

महापालिका निवडणूक : सक्षम पॅनलसाठी शोधाशोध

संदीप झिरवाळ : पंचवटी
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागात शिवसेना, भाजपा, मनसे, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस या पक्षांकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. यंदा चार जागांसाठी प्रभाग असून सक्षम उमेदवार मिळत नसल्याने कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याने कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेससाठी महापालिका निवडणूक कसोटी ठरणार आहे.
पंचवटी विभागात सहा प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात चार याप्रमाणे २४ सदस्य असणार आहेत. आरक्षण व प्रभाग रचना बदलल्याने काही लोकप्रतिनिधींचा पत्ता कट झाला असल्याने त्यांनी आरक्षणानुसार कुटुंबातील सदस्यांना यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. पंचवटी विभागात अद्याप कोणत्याही पक्षाकडे चार उमेदवारांचे पॅनल पूर्ण झालेले नाही. एकेका प्रभागातून पाच ते सहा जण एकाच जागेसाठी इच्छुक असल्याने उमेदवार चाचपणीसाठी पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे. पंचवटीत भाजपा, शिवसेनेकडे सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत तर या उलट परिस्थिती मनसेची आहे. मनसेकडे ठराविक प्रभाग सोडले तर सक्षम उमेदवारच नसल्याने मनसेला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. कॉँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी अनेकांनी केली असली तरी अद्याप प्रभागनिहाय कोणत्याही उमेदवाराचे नाव पुढे येत नसल्याने व पाहिजे तशी तयारी सुरू न केल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.  राष्ट्रवादी कॉँग्रेसची काहीशी अशीच परिस्थिती आहे. उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी काही इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून स्वत:लाच उमेदवार मानून प्रभागात प्रचार सुरू केला आहे. शिवसेना, भाजपाकडे उमेदवार असले तरी अद्याप उमेदवारी कोणाला मिळणार हे जाहीर केलेले नाही. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे काही ठराविक प्रभागात सक्षम उमेदवार सोडले तर उमेदवार नसल्याने चार जागांसाठी पॅनल निर्मिती कशी होणार, हा मोठा प्रश्न आहे. सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी स्वत:च परिचय पत्रके छापून स्वत:ची छबी त्यावर उमटवून लोकप्रतिनिधी नसताना केलेल्या कामाचा आढावा प्रसिद्ध करून एकटे फिरून स्वत:चाच प्रचार करण्याचा धडाका लावला असल्याचे दिसून येते.